बुलढाणा: अभ्यासात हुशार असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाले पण राजकारणात आले अन राजकारण , आमदारकीत रमले असे अनेक नेते जिल्ह्यात कार्यरत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही प्रस्थापित डॉक्टर आमदारासह हौशी डॉक्टरही उतरले आहे. ऐंशीच्या दशकातील सक्षम महिला नेत्या श्रद्धा टापरे या जिल्ह्यातील आद्य डॉक्टर आमदार ठरल्या. अन्य डॉक्टर आमदारांसोबत तुलना केल्यास राजेंद्र शिंगणे सर्वात यशस्वी डॉक्टर आमदार ठरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राजकारण आणि निवडणुका हा भारतीयांचा आवडीचा विषय राहिला आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत अलीकडे चॅनेल्स आणि समाज माध्यम मुळे राजकीय प्रेमात लक्षणीय वाढ झाली. याला डॉक्टर मंडळी देखील अपवाद नाही. बुलढाणा जिल्ह्यातही डॉक्टर आमदार किंवा राजकारणी डॉक्टरांची संख्या लक्षणीय आहे. तत्कालीन जलंब आणि आताच्या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या महिला नेत्या डॉक्टर श्रद्धा टापरे या जिल्ह्यातील प्रथम आमदार ठरल्या. विशेष म्हणजे त्या ऐंशीच्या दशकात सलग दोनदा जलंब च्या आमदार राहिल्या. जलंब मध्ये शेकापचे वर्चस्व आणि काँग्रेसची दोन शकली झाली असतांना त्या दोनदा आमदार झाल्या . इंदिरा काँग्रेस कडून लढताना डॉक्टर टापरे (२८ हजार ८मते) यांनी बाजी मारली. काँग्रेस अर्स चे विठ्ठल उमरकर (१५,०४०), शेकापचे माणिक पाटील ( १९,१९७) , भाजपचे पंजाब देशमुख (५१७८) यांचा त्यांनी पराभव केला. १९८५ मध्येही त्या आमदार होऊन विधानसभेत पोहोचल्या. डॉक्टर टापरे (३३, ५३७) यांनी शेकापचे गजानन देशमुख ( ३२,७११) यांचा निसटता पराभव केला. १९९० मध्ये मात्र शिवसेनेचे कृष्णराव इंगळे यांच्याकडून पराभूत झाल्यावर त्यांचे वर्चस्व कमी झाले.
हेही वाचा : Video : भूगांव येथील पोलाद प्रकल्पात स्फ़ोट, २१ कामगार जखमी
डॉक्टर गोडे आणि सेनेचे बंड
१९९० मध्ये बुलढाणा मतदारसंघातून शिवसेनेचे डॉक्टर राजेंद्र गोडे विजयी होऊन आमदार झाले. त्यावेळी मंडल आयोगाच्या शिफारस वरून सेनेत बंड झाले. त्यात डॉक्टर गोडे आणि कृष्णराव इंगळे हे देखील सहभागी झाले. काँग्रेस मध्ये आल्यावर त्यांना गृह खात्याचे उपमंत्री पद मिळाले. मात्र बुलढाणेकराना तेंव्हाही गद्धारी न आवडल्याने ते १९९५ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आणि १९९९ मध्ये राष्ट्रवादी च्या तिकिटावर पराभूत झाले.
डॉक्टरांची चलती
दरम्यान नव्वदीच्या दशकाच्या उत्तरार्धात जिल्ह्याच्या राजकारणात आणखी काही डॉक्टर आमदारांची भर पडली. १९९५ मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्यावर डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा मधून अपक्ष आमदार झाले.त्यानंतर ते राष्ट्रवादीचे आमदार म्हणून सलग तीनदा निवडून आले.२०१४ ची निवडणूक ते लढले नाही पण २०१९ मध्ये पुन्हा आमदार झाले. यंदाच्या लढतीत ते सिंदखेडराजा मधून शरद पवारांच्या तुतारीवर लढत आहे. यादरम्यान जिल्हा बँकेचे अध्यक्ष, पणन महासंघाचे अध्यक्ष, राज्य आणि कॅबिनेट मंत्री, बुलढाण्याचे पालकमंत्री} झाले.डॉक्टर आमदारांपैकी सर्वात यशस्वी आमदार म्हणून त्यांची नोंद झाली. त्यांच्या विरोधात दोनदा अयशस्वी झुंज देणारे शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर हे २०१४ मध्ये आमदार झाले.यंदाच्या अजितदादा गट आणि शिंदे सेना गटाच्या मैत्रीपूर्ण लढतीत चौथ्यांदा ते शिंदे गटातर्फे भाग्य आजमावत आहे. शेजारील मेहकर मतदारसंघातील डॉक्टर संजय रायमूलकर हे पशुचिकित्सक आहेत. मात्र त्यांनी मेहकर मधील माणसांचे इतके अचूक निदान आणि ‘उपचार’ केले की ते २००९ ते २०१९ असे सलग आमदार झाले. यंदा चौथ्यांदा ते मैदानात उतरले आहे. जळगाव मतदारसंघात डॉक्टर संजय कुटे यांनी २००४ पासून सलग चारदा आमदारकी मिळविली. आता पाचव्या विजयासाठी ते झुंज देत आहे. यापैकी तीन डॉक्टरांच्या विजयाची दाट शक्यता असून आघाडी, युती पैकी कोणाचेही सरकार आले तरी एकाला ‘लाल दिव्याची’ संधी आहे.
हेही वाचा : लोकजागर: रिपब्लिकनांची बोळवण!
यंदा सहा डॉक्टरांची भर
यंदाच्या लढतीत राजकारण प्रेमी सहा डॉक्टरांची भर पडली आहे.आमदार डॉक्टर कुटे विरोधातील प्रमुख उमेदवार स्वाती वाकेकर (काँग्रेस आघाडी) , वंचित बहुजन आघाडीचे प्रविण पाटील देखील डॉक्टर आहेत. याशिवाय मेहकर मधून ऋतुजा चव्हाण( वंचित), संतोष तायडे, चिखली मधून मोबिन खान यांनी राजकारणात ‘एन्ट्री’ केली आहे.