नागपूर : जळगाव जवळ बुधवारी पुष्पक एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी आगीच्या भीतीने डब्यातून उड्या घेतल्या आणि दुसरीकडून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसच्या धडकेत सात प्रवाशी ठार आणि ४० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. मात्र अशा प्रकारे घडलेली ही पहिली घटना नव्हे. यापूर्वी अशीच घटना अमृतसरजवळ घडली होती. जालंधर-अमृतसर डीएमयू या गाडीतील प्रवाशांना अमृतसर-हावडा एक्स्प्रेसने चिरडले होते.
१९ ऑक्टोबर २०१८ रोजी अमृतसरजवळ दसरा उत्सव पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या लोकांना दोन रेल्वे गाड्यांनी चिरडले. यात जवळ जवळ ६० लोकांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते. तब्बल ३०० लोकांचा जमाव फटाके पाहण्यासाठी रुळावर उभा होता. जालंधर-अमृतसर डीएमयू रुळांवर आल्यावर काही लोक दुसऱ्या ट्रॅकवर गेले आणि तितक्यात अमृतसर-हावडा एक्स्प्रेस आली; ज्यामुळे हा भीषण अपघात घडला. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. यात अनेक कलाकारांना, अमृतसर महानगरपालिका, कार्यक्रमात सहभागी असलेले राजकारणी, पोलिस आणि रेल्वे यांना दोषी ठरवण्यात आले.
अनेक अपघात
अनेक कारणांमुळे गेल्या दशकभरात देशात अनेक रेल्वे अपघात झाले आहेत. या भीषण रेल्वे अपघातांवर आणि हे अपघात घडण्यामागील कारणे काय होते, ते बघूया. २६ मे २०१४ रोजी हिसार-गोरखपूर मार्गावरील गोरखधाम एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले. हा अपघात यांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात २९ प्रवाशांनी आपला जीव गमावला, तर ७० हून अधिक लोक जखमी झाले.
वाराणसी-डेहराडून जनता एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील एका स्थानकावर २० मार्च २०१५ रोजी मोठा अपघात झाला आणि रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात ३९ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आणि १५० प्रवासी जखमी झाले.
पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडीजवळ सोमवारी सकाळी (१७ जून) रेल्वेचा भीषण अपघात झाला. कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने मागून धडक दिल्याने किमान नऊ जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले.
२६ मे २०१४ रोजी हिसार-गोरखपूर मार्गावरील गोरखधाम एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले आणि मोठा अपघात झाला. हा अपघात यांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात २९ प्रवाशांनी आपला जीव गमावला, तर ७० हून अधिक लोक जखमी झाले.
हेही वाचा – अकोल्यातून १५ हजारांवर बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र? किरीट सोमय्यांचा आरोप; ‘एसआयटी’मार्फत….
२१ जानेवारी २०१७ रोजी जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस आंध्र प्रदेशातील कुनेरू स्टेशनवर रुळावरून घसरली. ओडिशाकडे जाणाऱ्या रेल्वेच्या या अपघातात ४० जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. जुलै २०१७ मध्ये माओवाद्यांनी या प्रदेशात स्फोटके पेरल्याचा आरोप फेटाळला गेला. इंदूर-पाटणा एक्स्प्रेस आणि हिराखंड एक्स्प्रेस प्रकरणांमध्ये अद्याप अंतिम अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही.