चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्ड मधील रहिवासी जमजम महमूद पठाण ही सोमवार ६ आणि मंगळवार ७ जानेवारी रोजी कौन बनेगा करोडपती गेम शोच्या हॉट सीटवर दिसणार आहेत. बीग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोरील हॉट सीटवर बसून जमजम पठाण ही उत्तरे देणार आहे.
बल्लारपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेस पदाधिकारी महमूद पठाण यांची मुलगी जमजम पठाण, ६ जानेवारी रोजी सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर दिसणार आहे. ६ आणि ७ जानेवारी रोजी प्रसारित होणाऱ्या शोमध्ये झमझम पठाण दिसणार आहे. जमजम पठाण लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करत आहे. तिने संगणकशास्त्रात अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. तिला लहानपणापासूनच सामान्य ज्ञानाची आवड आहे.
हेही वाचा…नववर्षात प्रथमच सोने-चांदीच्या दरात घट… हे आहेत आजचे दर…
u
तिने दिलासाग्राम कॉन्व्हेंट, बल्लारपूर, ज्युनिअर कॉलेज, माउंट सायन्स कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्याचप्रमाणे चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणकशास्त्रात बी.ई. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. २०१४ मध्ये जमजमच्या आईचे निधन झाले आणि तिचे संगोपन आणि काळजी तिचे वडील महमूद पठाण घेत आहेत. दोन दिवस प्रसारित होणाऱ्या या शोचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून सोमवार आणि मंगळवारी तो प्रसारित होणार असल्याची माहिती जमजमचे वडील महमूद पठाण यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कौन बनेगा करोडपती हा टी.व्ही.शो सुरू झाला होता तेव्हा चंद्रपुरातील वीज केंद्रात कार्यरत एक अधिकारी या शो साठी प्रश्न -उत्तरे तयार करून पाठवित होता. त्यानंतर चंद्रपुरच्या अनेकांना या शो मध्ये सहभागी होण्याची संशी मिळाली. आता बल्लारपूरची कन्या जमजम या शो मध्ये सहभागी होवून हॉटसीटवर बसून महानायक अमिताभा बच्चन यांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. या शो कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.