लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्धा: केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालय समितीतर्फे चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय ग्रामीण भागातील निवासी शाळा म्हणून लोकप्रिय ठरल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत या शाळेतील विद्यार्थी पात्र असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित तसेच आधुनिक शिक्षणाचा समन्वय साधत मोफत शिक्षण दिल्या जाते. त्यामुळे या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी चढाओढ असते. मात्र परीक्षा घेवूनच प्रवेश दिल्या जातो.

इयत्ता सहावी साठी प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १० ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर परीक्षा २० जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.परीक्षेचा अर्ज दाखल करताना निवासी दाखला,जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड अनिवार्य आहे. इच्छूक विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शाळेत पाचवीत शिकणारा असावा. त्याचा जन्म १ मे २०१२ ते ३१ जुलै २०१४ या कालावधीतील असला पाहिजे.