हातमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या आईने आपल्या मुलीला ‘डॉक्टरेट’ची पदवी मिळवण्यासाठी बळ दिले. स्त्रीभ्रूण हत्येवरील संशोधनातून जया हरिभाऊ वझिरे या विद्यार्थिनीने आचार्य पदवी प्राप्त केली. आईचे स्वप्न लेकीने पूर्ण करून एक आदर्श निर्माण केला.खामगाव परिसरातील गोंदनापूर येथील जया ही अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी. आई छाया वझिरे हातमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. वडिलांचे निधन झाले. आपल्या मुलीने आचार्य पदवी प्राप्त करून प्राध्यापक व्हावे, अशी मनीषा उराशी बाळगून छाया वझिरे यांनी कठोर मोलमजुरी करीत मुलीचे शिक्षण पूर्ण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या जयाने शहरातील प्रा.डॉ. गणेश बोरकर यांचा मार्गदर्शनात राजस्थानातील विद्यापीठातून ‘स्त्रीभ्रूण हत्या या समस्येवर शिक्षकांच्या मताचे अध्ययन’ या विषयावर संशोधन केले. जयाला नुकतीच आचार्य पदवी जाहीर करण्यात आली आहे. जयाने कठोर परिश्रम व अभ्यासातील सातत्यातून आईचे स्वप्न पूर्ण करीत आचार्य पदवी प्राप्त केली. जया गावातील आचार्य पदवी प्राप्त पहिली युवती ठरली. वडील जगात नसताना आईच्या कष्टामुळे जयाने आचार्य पदवी प्राप्त केली. या यशाबद्दल तिची आजी सेवानिवृत्त शिक्षिका ९० वर्षीय माला शेगोकार यांनी आनंद व्यक्त केला. जयाच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.