वर्धा : राज्यातील सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. प्रकरणाची सुनावणी सतत पुढे ढकलली जात आहे. न्यायाला जेव्हा उशीर होतो, तेव्हा ‘जस्टीस डीले, जस्टीस डेनाय’ असे म्हटले जाते. असे झाले तर सर्वच राज्यात आमदार फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
वर्धा दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, सर्व काही साम, दाम, दंड, भेदाने करता येते, ही वृत्ती निर्माण झाल्यास पालिका निवडणुकीससुद्धा उभे राहण्याचे धाडस कुणी करणार नाही. राज्यातील सत्ता संघर्षाचा निवाडा करायाला आता खंडपीठ स्थापन झाले आहे. खंडपीठाच्या विवेकावर आपण अवलंबून राहू. ते काही तरी निर्णय घेतील, असेही पाटील म्हणाले.