नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून पदमुक्त करण्याचा सपाटा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लावला आहे. तर अजित पवार यांनी स्वत:ला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करून प्रदेशाध्यक्षपासून तर विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे.
पक्षात फूट पडल्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बाबा गुजर यांची हकालपट्टी केली होती. त्यांची आता अजित पवार गटाने त्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
हेही वाचा… ‘MPSC’च्या ‘या’ पदाच्या चाळणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वाचा सविस्तर
प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीत आणलेले जय जवान किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार हे देखील अजीत पवार यांच्या गटात सामील झाले. त्यांना प्रदेश प्रवक्ते करण्यात आले आहे.