नागपूर : अजित पवार गटाचा कोणताही आमदार शरद पवारांकडे जाणार नाही आणि कोणी त्यांच्या संपर्कात नाही. मात्र, जयंत पाटील आमच्याकडे येऊ शकतात, कारण ते आमच्या संपर्कात आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धर्माराव आत्राम यांनी शरद पवार गटाला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्राम नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. आमच्याकडे सध्या ४५ आमदार आहे. सध्या कोणीही शरद पवार यांच्या संपर्कात नाही. उलट त्यांच्याकडेच असलेले आमदार आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून त्यांचे बोलणे सुरू आहे. त्यामुळे जयंत पाटीलसह ते आठ अमदार अजित पवार गटात येतील, असा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केलाय.

हेही वाचा >>> शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख विरुद्ध पदाधिकाऱ्यांचे बंड!

आमच्या सर्व आमदार, मंत्र्यांची दर मंगळवारी  बैठक असते. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते सगळे ४५ आमदार बैठकीला उपस्थित होते. आमच्या गटाचे  आमदार नाराज आहे, यात काहीएक तथ्य नाही. मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी मिळत आहे, असेही आत्राम यांनी सांगितले.