लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. सहा दिवस चाललेल्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजवला तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी. आपल्या मिश्किल भाषणाने त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच चिमटे काढले. त्याला सभागृहातून दादही मिळाली. विषय होता तो न झालेल्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचा.

एक महिना झाला निवडणुका होऊन. वीस दिवस मुख्यमंत्र्यांच्या व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला झाले.पण अद्याप खाते वाटप झाले नाही. ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली पण कोणाला ते कोणत्या विभागाचे मंत्री आहेत हे माहिती नाही. एकट्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन ओढून नेले. त्याचा दुसरा अर्थ असा की, सिर्फ एक मुख्यमंत्री काफी है, इतरांची गरज नाही हा संदेश यातून जातो. असा टोला जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला. खाते वाटप न झाल्याने अस्वस्थ मंत्र्यांकडे त्यांनी लक्ष वेधले.

आणखी वाचा-अजित पवारांच्या पुढे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी घोषणा

महाराष्ट्र आता थांबणार नाही….

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी सभागृहात सादर केलेल्या कवितेचाही समाचार घेतला. ही ओळ भाजपच्या २०१४ च्या संकल्पपत्रातील असून दोन वर्षाचा महाविकास आघाडीचा कार्यकाळ वगळता युतीचीच सत्ता होती व या काळात महाराष्ट्रावरील कर्जात वाढ झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

पुन्हा सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीचे पहिले अधिवेशन होते. विरोधक संख्येने कमी असले तरी त्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडून वेळोवळी सरकारला कोंडीत पकडले. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनीही भाजप सदस्य सुरेश धस यानी सभागृहात मांडलेल्या पीक विमा घोटाळ्याचा उल्लेख करीत फडणवीस यांना उद्देशून ‘ राम तेरी गंगा मैली हो गई,पापीओंके पाप धोते धोते’ असे म्हणण्याची वेळ येऊ नये,असा टोला हाणला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil sarcastic speech to ruler party on last day of winter session of the legislature cwb 76 mrj