नागपूर: लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मीमातेची चांदीची मूर्ती, सोन्याचे बिस्किट आणि रोख रक्कम ठेवण्यात आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी लक्ष्मीमातेच्या मूर्तीसह सर्व माल चोरून नेला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीसीटीव्ही फुटेज आणि श्वान पथकाच्या मदतीने चोराचा शोध पोलीस घेत आहेत. क्वेटा कॉलनी येथील रहिवासी फिर्यादी मनीष सुगंध हे किराण्याचे होलसेल व्यापारी आहेत. मस्कासाथ येथे त्यांची दुकान आहे. त्यांची क्वेटा कॉलनीतील सदनिकेत पहिलीच दिवाळी होती. लक्ष्मीपूजनाला घरातील चांदीच्या लक्ष्मीमातेच्या मूर्तीसमोर सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम ठेवण्याची कौटुंबिक परंपरा आहे. त्याप्रमाणे सुगंध यांनी देवघरात लक्ष्मीपूजा मांडली. घरातील चांदीच्या तीन मूर्ती, सोन्याचे ९ बिस्किट, चांदीचे सिक्के आणि ८० हजार रुपये रोख असा एकूण १० लाख रूपयांचा मुद्देमाल पूजेसाठी ठेवला. पूजा आटोपल्यानंतर प्रथेप्रमाणे घराचे दार उघडे ठेवून कुटुंब झोपी गेले. ही संधी साधून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करुन लक्ष्मीच्या मूर्तीसह १० लाखा रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल चोरून नेला.

हेही वाचा… नागपूर: परीचारिकेची टास्क फ्रॉडमधून ३ लाखांनी फसवणूक

सकाळी उठल्यावर सुगंध मोबाईल शोधत होते. मात्र, मोबाईल मिळाला नाही. शोधत शोधत देवघरात गेले असता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पुजेसाठी ठेवलेले संपूर्ण सोन्या चांदीचे दागिने मिळून आले नाही. लगेच त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी प्रवेशव्दारावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अज्ञात आरोपी घरात प्रवेश करताना दिसत आहेत. श्वान पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewellery worth ten lakhs along with lakshmi idol stolen in nagpur adk 83 dvr