बुलढाणा: सहकारी तत्वावर उभारणी करण्यात आलेला विदर्भातील पहिला प्रकल्प मात्र गत १० वर्षांपासून बंद असलेला जिजामाता सहकारी साखर नव्याने सुरू होणार आहे. यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करणारे बुलढाणा अर्बन नागरी सहकारी पतसंसंस्थेचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी ही ‘गोड बातमी’ दिली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील हा कारखाना आता व्यंकटेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड ने हा विकत घेतला आहे. मागील १० वर्षापासुन कारखाना बंद स्थितीत होता. तो सुरू करण्यासाठी शासन स्तरावरुनही प्रयत्न झाले. मात्र ते अयशस्वी ठरले. मात्र मागील तीन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करणारे राधेश्याम चांडक यांचे प्रयत्न सफल ठरले.
हेही वाचा… दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यानेच उघडला दारूचा गुत्ता
बुलढाणा अर्बनने ‘व्यंकटेश’ ला ३० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन दिले. यातही बुलढाणा अर्बनने राज्याची अस्मिता व सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कारखान्याचे जिजामाता सहकारी साखर कारखाना हे नाव न बदलण्याच्या अटीवर हे कर्ज देण्यात आले आहे. २३ ऑगस्ट रोजी रोजी कारखान्याची खरेदी झाली आहे. लवकरच कारखाना पुर्ववत सुरु करण्यात येणार आहे.
हेही वाचा… विदर्भातील आर्थिक मागास विद्यार्थ्यास मोफत उच्च शिक्षण; माजी खासदार दत्ता मेघे यांचा संकल्प
यापुर्वी बुलढाणा जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखाने बुलढाणा अर्बनच्या पुढाकाराने सुरु करण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे धाड (वरुड) येथील अनुराधा सहकारी साखर कारखाना व मेहकर येथील महेश शुगर हे दोन कारखाने बंद स्थितीत होते परंतु बुलडाणा अर्बननेच पुढाकार घेवुन सदर कारखाने सुरु केले असुन ते चांगल्या प्रकारे चालु आहेत. बुलढाणा जिल्ह्यात आता तिन सहकारी साखर कारखाने असुन शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करावी त्यामुळे जिल्ह्यात हरितक्रांती घडून येईल व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल असा विश्वास श्री. राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केला आहे.