महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात शिंदे-भाजपा सरकारला धारेवर धरलं आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-भाजपा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा हरली आहे. त्यामुळे कन्नडिगे अस्मितेला हातभार लावण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

जितेंद्र आव्हाड विधिमंडळच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “सीमाभागाच्या प्रश्नाबाबत सरकारने सात-आठ दिवस झालं एकही शब्द काढण्यात आला नाही. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, याबाबत बोम्मईंनी एक दिवसात ठराव केला. आपलं सरकार उद्या ठराव घेऊ म्हणत आहे. मात्र, तिथे मराठी बातमी माणसाच्या कानफाडीत बसली असून, २८८ आमदारांच्याही ही कानफाडात मारली आहे,” असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

हेही वाचा : “नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या”, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले, “आधी…”

“सीमावर्ती भागातील लोकांसाठी आम्ही काहीच करु शकलो नाही, त्यामुळे त्यांची माफी मागितली पाहिजे. कर्नाटक अन्याय करताना आम्ही षंढासारखे बगत राहिलो. आम्ही इथे लढायला पाहिजे होतं,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘हा निर्लज्जपणाचा कळस’, अब्दुल सत्तारांच्या माध्यमातून लक्ष्य करणाऱ्या अजित पवारांना CM शिंदेंचं उत्तर, म्हणाले “त्यांच्याही प्रकरणाची…”

“मुख्यमंत्री नसल्याने ठराव मांडला नाही. पण, ठराव मांडला असता तर ही माहिती कर्नाटकला मिळाली असती. मात्र, कर्नाटकात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा हरली आहे. त्यामुळे कन्नडिगे अस्मितेला हातभार लावण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे. विधानसभा संपताना ठराव मांडायचा. एकदा विधानसभा संपली की त्यावर चर्चा होणार नाही,” असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.