आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झा़डून घेतली असती, असा दावा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. यावरून राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “सत्ता मिळाली नाहीतर, माझ्या जीवाचं बरे वाईट करून घेईन, हेच त्यांचं मत होते,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की, “सत्ता हे सर्वस्व आहे. सत्ता नाही मिळाली, तर माझ्या जीवाचं बरे वाईट करून घेईन, हेच त्यांचं मत होते. लोकशाहीत असं नसतं. तुम्हाला जनतेच्या सामोरे जावं लागतं. जय-पराजय हा अविभाज्य घटक आहे.”

Eknath Shinde Group , Pratap Sarnaik,
स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!

हेही वाचा : “अहो, तुम्ही नुसतीच दाडी कुरवाळत बसता, मग…”, अजित पवारांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार

“मंत्रिमंडळ स्थापन होण्याच्या आधीपासून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंबरोबर नव्हते. याचा व्यक्तीगत पुरावा कुणाला पाहिजे असेल तेव्हा देण्यास मी तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या आधी मी मुख्यमंत्री झालं पाहिजे, असं एकनाथ शिंदेंच्या मनात होतं,” असा दावाही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात केली? मुंबई पोलीस म्हणाले…

‘गद्दार’, ‘खोके’ याशिवाय विरोधकांकडे काही शिल्लक राहिलं नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होतं. याबद्दल विचारल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “तुम्ही केलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. कर्नाटकातील ४० टक्क्यांवर सगळं सरकार गेलं. तुमचे ५० टक्के तर घराघरात पोहचले आहेत. गाढव, म्हैस आणि घोड्यांवर ५० खोके लिहितात. तुमच्याबद्दल लोकांच्या मनात राग किती आहे, याचा विचार करा.”

Story img Loader