अमरावती : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडमध्ये (बीएसएनएल) सलग ३५ वर्षे नोकरी करून २०२० मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या एका कर्मचाऱ्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द करण्यात आले. त्यांनी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी बळकावल्याचे स्पष्ट झाल्यावर बीएसएनएलतर्फे अधिकारी राकेश खंडेलवाल यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लक्ष्मणसिंग नथ्थुसिंग ठाकूर (६०) रा. मसानगंज अमरावती असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. लक्ष्मणसिंग ठाकूर यांची ८ नोव्हेंबर १९८५ रोजी येथील बीएसएनएलमध्ये शिपाई म्हणून श्याम चौक येथील मुख्य कार्यालयात नेमणूक करण्यात आली. १ ऑक्टोबर २०२० पासून ते बीएसएनएलमध्ये टेलीकॉम टेक्निशियन या पदावर कार्यरत होते. दरम्यान, आमदार उदयसिंग पाडवी व ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल, रायगड या संघटनेने बीएसएनएलच्या मुंबई कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या नावासह तक्रार नोंदविली. यादीतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेमणुकीच्या वेळी अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन त्या संवर्गासाठी राखीव असलेली नोकरी बळकाविल्याचे त्या तक्रारीत नमूद होते. त्या यादीत लक्ष्मणसिंग नथ्थुसिंग ठाकूर यांचेदेखील नाव होते. त्यामुळे लक्ष्मणसिंग ठाकूर यांना त्यांचे जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्रासह सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे जातीचे प्रमाणपत्र तपासणीकरिता अर्ज सादर केला. त्या कार्यालयाने २७ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशानुसार लक्ष्मणसिंग ठाकूर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून ते रद्द केले. तथा त्यांच्याविरुद्ध जातीचे प्रमाणपत्र देण्याची व त्याचे पडताळणी विनियमनाअन्वये कार्यवाही करण्याचे लेखी आदेश बीएसएनएलला देण्यात आले.

हेही वाचा – यवतमाळ : जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड, खात्यात ४१ कोटींचा अग्रीम पीक विमा जमा

हेही वाचा – वर्धा : बुडून मृत्यू नव्हे तर खूनच असल्याचे उघड; मुलानेच बापास…

त्यानुसार आरोपी लक्ष्मणसिंग ठाकूर यांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून अनुसूचित जमातीसाठी राखीव नोकरी बळकाविली. वेतन व विविध प्रकारचे भत्ते प्राप्त केले. कार्यालयाची फसवणूक केल्याची तक्रार कोतवाली ठाण्यात दाखल करण्यात आली.