सुशिक्षित बेरोजगारांसाठी संधी
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालय व स्वयं फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील युवकांसाठी स्वयंरोजगार प्रेरणा अभियान राबवण्यात येणार आहे.
अभियानाचे उद्घाटन रविवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पावर हाऊस चौक वर्धमाननगर येथील परंपरा लॉन्स मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती एमएसएमई विकास संस्था नागपूरचे संचालक पी.एम.पाल्रेवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
अभियानामध्ये जवळपास सातशे ते आठशे सुशिक्षित बेरोजगार सहभागी होतील. तसेच उद्योग थाटण्यास लागणारी सर्व मदत व बाजारपेठेतील समर्थन व बँकेतूनही मुद्रा कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करेल, अशी माहितीही पार्लेवार यांनी दिली. कार्यक्रमस्थळी विविध प्रकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी आवश्यक यंत्रे ठेवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला स्वयं फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण, नागपूर एमएसएमईचे सहसंचालक सुनील खुजणारे, वाय.बी. बघेल, किशोर दळवी उपस्थित होते.