अमरावती : सौदी अरेबियामध्ये नोकरी लावून देण्याची बतावणी करून आणि व्हिसा, पासपोर्ट बनवून देण्याचे आमिष दाखवून काही बेरोजगारांची तब्बल ४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यांचे पासपोर्टसुद्धा ठेवून घेण्यात आले.

ही घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी मकसूद खान मेहमूद खान (४२) रा. पॅराडाइज कॉलनी यांच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमीदुल्ला (५५) व रियाज अहेमद (६०) दोघेही रा. बंगलोर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मकसूद खान हे चांगल्या नोकरीच्या शोधात होते. त्याचवेळी त्यांना महेदवीय माइंड ग्रुप नामक व्हॉट्सॲप ग्रुपवर नोकरी संदर्भातील एक जाहिरात दिसली. त्यामुळे त्यांनी हमीदुल्ला याच्याशी संपर्क साधला. त्याने बेरोजगारांना देश-विदेशात नोकरी लावून देण्यासोबतच त्यांचे पासपोर्ट व व्हिसा बनविण्यास आपण मदत करीत असल्याचे मकसूद खान यांना सांगितले. त्यानंतर हमीदुल्ला याने त्यांना मेडिकल व व्हिसा बनविण्यासाठी बंगळुरूला बोलाविले. त्यावेळी व्हिसा बनविण्यासह इतर वेगवेगळी कारणे सांगून मकसूद खान यांच्यासह इतर गरजूंकडून एकूण ४ लाख ३४ हजार २०० रुपये हमीदुल्ला व त्याचा सहकारी रियाज अहेमद यांनी उकळले.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?

हेही वाचा – नागपूर : कोराडी वीज निर्मिती प्रकल्पात बाॅयलर ट्यूब लिकेजमुळे २१५ दशलक्ष वीज युनिट्सचे नुकसान!

तसेच त्यांच्याजवळील पासपोर्टसुद्धा आपल्याकडे ठेवून घेतले. मात्र, रक्कम घेऊनही त्यांना नोकरी देण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मकसूद खान यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.