महापालिकेत १४९ पदांची नव्याने निर्मितीला मान्यता दिली आहे. यापूर्वी ७६९ व नव्याने निर्माण करण्यात आलेली १४९ पदे अशा एकूण १०१० पदांच्या आकृतीबंधास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच पालिकेत मेगा भरती होणार असून बेरोजगार युवकांना संधी मिळणार आहे.
चंद्रपूर ही ‘ड’ वर्ग महापालिका असून २०११ मध्ये पालिकेची स्थापना झाली. पालिकेचे कार्यक्षेत्र ५४.२८ चौ.कि.मी असून शहराची लोकसंख्या ३.५० ते ४ लाखाच्या जवळपास आहे. नागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाली आहे. पालिकेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे शासनाचे उपक्रम व योजना राबवण्यात दिरगांई होत आहे. त्यामुळे पालिकेला मनुष्यबळ वाढवणे गरजेचे होते.
हेही वाचा >>>नागपूर : तर पुन्हा फडणवीसांच्या निवासस्थानापुढे हनुमान चालिसा पठण?
पालिका आयुक्तांनी नव्याने पद निर्मितीचा आराखडा शासनास पाठवला होता. शासनाने ८६९ पदांपैकी ८ पदे व्यपगत करीत नव्याने आवश्यक असलेले १४९ पदांची निर्मिती करण्यास मान्यता दिली असून एकूण १०१० पदांच्या आकृतीबंधास मान्यता प्रदान केली आहे. आकृतीबंधाशी सुसंगती व पदानुक्रमाच्या सोयीसाठी महापालिकेतील काही पदांची नावे बदलवण्यात आली असून संवर्ग, वेतनश्रेणी व ग्रेड पे मध्ये बदल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पालिकेला नव्याने निर्मित पदाच्या वेतनाचा भार सोसावा लागणार आहे.