नागपूर: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. उमेदवारांनी वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष म्हणजे ही एकाप्रकारे मेगा भरतीच आहे. ती शिकाऊ उमेदवारांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची नुकताच अधिसूचना ही एस. टी. महामंडळाकडून काढण्यात आली आहे.
ही भरती प्रक्रिया १४५ पदांसाठी होत आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १३ जानेवारी २०२४ आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हे करावे लागणार आहेत.
हेही वाचा… ‘भारत’ऐवजी मोदी सरकार लिहिल्याचे पाहून ग्रामस्थ संतापले…; यात्रा अडवली, अधिकाऱ्यांना धरले धारेवर
एस. टी. महामंडळाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. फक्त दहावी पासच नाही तर उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असणेही आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाणे हे सातारा असणार आहे.
या सूचना वाचा
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. मग काय वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करा. जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर विभाग नियंत्रक कार्यालय, एस. टी. स्टॅण्ड येथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. मोटार मेकॅनिक वाहन जागा ४०, मेकॅनिक डिझेल एकूण जागा ३४, ऑटो इलेक्ट्रिशियन जागा ३०, प्रशितन व वातानुकुलिकरण जागा ६, मोटार वाहन शीट मेटल वर्कर जागा ३०, टर्नर जागा ३, वेल्डर जागा २ याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधी आहे. मग अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत.