वर्धा : राज्य शासनाच्या महसूल विभागाने तब्बल ४ हजार ६२५ पदांची एकाचवेळी भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी छत्तीस जिल्हा केंद्रातून ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे.सरळ सेवा भरती पद्धतीने १७ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान या पदासाठी परीक्षा होणार आहे. संभाव्य सुस्पष्ट तारीख नंतर जाहीर केल्या जाणार आहे. हे पद क गटातील तलाठीचे आहे. विविध आरक्षण आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र पदसंख्या व आरक्षणात संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. वेळोवेळी झालेला बदल सूचित केल्या जाणार आहे. महिला आरक्षणाचा लाभ घेण्यास इच्छुक महिलांना न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचे प्रमाणपत्र न चुकता सादर करायचे आहे. जाहिरातीचा तपशील सर्व विभागीय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job recruitment decision of revenue department of state government pmd 64 amy