लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने महायुती सरकार आणि भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात ठिकाठिकाणी आंदोलने सुरु आहेत. काँग्रेसने सोमवारी नागपुरातील महाल, गांधी गेट येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारच्या विरोधात ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. काँग्रेस नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केले. शिवाजी महाराजाच्या पुतळयाला हार अर्पन करुन शिवाजी महाराजांचा जयघोष केला. त्यानंतर महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि सरकारच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

आणखी वाचा-बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू! पोळा सणावर शोकाचे सावट

यावेळी आमदार विकास ठाकरे यांनी सरकार टीका केली. भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करुन छत्रपती शिवरांयाचा अपमान करण्याचे पाप केले. सिंधुदुर्ग जिल्यातील मालवण च्या राजकोट किल्यावरील शिवरायाचा केवळ पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करुन प्रत्येक निवडणुकीत मते मागणाऱ्या भाजपा सरकारने त्यांच्या पुतळयाच्या कामात भ्रष्टाचार केला. राज्याच्या इतिहासात अशी घटना यापूर्वी कधीही घडली नाही. शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपाची पेशवाई वृत्ती आहे, असेही विकास ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा-Video : गोंदियात ‘हिट अँड रन’, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते हातात तिरंगे झंडे व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र हातात घेवून भाजपा सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. यावेळी मिडिया सेल अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, महासचिव उमाकांत अग्निहोत्री,उद्येाग व वाणिज्य सेल अध्यक्ष अतुल कोटेचा, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, बंटी शेळके,मिलीद दुपारे, सुनील जाधव, गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे, रमन पैगवार, रमेश पुणेकर, आशिष दिक्षित, वसीम खान, कमलेश समर्थ, श्रीकांत ढोलके, राजेश कुंभलकर, ॲड. नंदा पराते, संगीता तलमले, तौषिक खान, महेश श्रीवास यांच्यासह प्रमुख उपस्थितीत सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘नही चलेगा नही चलेगा मोदी सरकार नही चलेगा’, ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘महाराष्ट्र सरकार हाय हाय के नारे’ व फलक हातात घेवून उभे होते.