मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आमदारद्वय बच्चू कडू व रवी राणा यांच्यातील वाद मिटल्याचा दावा करण्यात येत असला तरी ग्रामीण पातळीवर मात्र दोघांतील संघर्ष कायम असल्याचे चित्र आहे. संग्रामपूरमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून आज आमदार राणा यांच्या प्रतिमेची धिंड काढून ‘जोडे मारो’ आंदोलन करून निषेध करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नागपूर: कडू व राणा यांचा वाद मिटल्यात जमा – सुधीर मुनगंटीवार

प्रहर जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या आ. राणा यांच्या निषेधार्थ नगरपंचायतमध्ये सत्तेत असलेल्या प्रहारने बसस्थानक परिसरात आज, ३१ ऑक्टोबरला निषेध आंदोलन केले. आ. राणा यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून व जोडे मारून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आठवडी बाजार येथून आ. राणा यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आली. ‘बच्चू कडू तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘या रवी राणाच करायचा काय, खाली मुंडकं वर पाय’, अशा घोषणा देण्यात आल्या. बस्थानकासमोर राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संग्रामपूर नगर पंचायतचे अध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, गटनेते, नगरसेवक, कार्यकर्ते, संग्रामपूर मित्रपरिवार आघाडीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.