लोकसत्ता टीम
चंद्रपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे.
त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खासदर अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ ब्रम्हपूरी येथील शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले.
आणखी वाचा- वर्धा : खळबळजनक! वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीची चौथ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या
यावेळी भाजप खासदार अनुराग ठाकुर यांच्या प्रतिकात्मक फोटोवर शाईफेक करून जोडेमारो आंदोलन करण्यात आले. व भाजप सरकार तसेच मनुवादी विचारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, जिल्हा काँग्रेस सचिव विलास विखार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी नगरसेवक नितीन उराडे, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काँग्रेस सचिव मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, माजी जि.प.सदस्या स्मिता पारधी, बाजार समिती उपसभापती सुनीता तिडके यांसह तालुका/शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महीला काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटल , सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी वाचा-सोन्याचे दर पुन्हा ७० हजार पार…हे आहे आजचे दर…
वडेट्टीवारांकडून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत, अतिवृष्टीमुळे घरांची पडझड
मागील काही दिवसांपासून ब्रम्हपूरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. यात तालुक्यातील मालडोंगरी येथील कमलाबाई मारोती झिलपे व मारोती सीताराम मिसार यांच्या घरांची पडझड झाली. याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मिळताच त्यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते तात्काळ आर्थिक मदत पोहचवुन बेघर झालेल्या दोन्ही कुटुंबियांना आधार दिला.
यंदाच्या वर्षी पावसाळा ऋतुचे उशिरा आगमन झाले. तर जूलै महीन्याच्या उत्तराधार्त पडलेल्या मुसळधार पावसाने ब्रम्हपूरी तालुक्यात हाहाकार माजवला. यामुळे तालुक्यात पुरपरिस्थिती निर्माण होऊन हजारो हेक्टर वरील पिके उद्ध्वस्त झाली. तर गावांमधील घरांची सुध्दा नासधूस झाली. काल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार ह्या ब्रम्हपूरी तालुक्यात दौऱ्यावर असतांना तालुक्यातील मालडोंगरी येथील राहत्या घरांची पडझड झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या घरांची पाहणी करून आर्थिक मदत करीत आधार दिला. व सदर नुकसानीबाबत शासनस्तरावरून लवकरच राज्याचे विरोधी पक्षनेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले.
आणखी वाचा-भाजपच्या मनुवादी वृत्तीचा काँग्रेसकडून निषेध, नागपुरात आंदोलन
यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, माजी नगरसेविका वनीता अलगदेवे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, सरपंच मंजुषा ठाकरे, उपसरपंच विनोद घोरमोडे, माजी सरपंच राजेश पारधी, गणेश घोरमोडे, हिरालाल सहारे, ग्रा.पं. सदस्या भावना गायकवाड, ग्रा.पं.सदस्य माया धोंगडे, विजयदुत निकेश पारधी यांसह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
© The Indian Express (P) Ltd