लोकसत्ता टीम

चंद्रपूर : सोशल मीडियावर बदनामीकारक, अश्लील पोस्ट व्हायरल करून ती काढून टाकण्यासाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या ‘माय चंद्रपूर’ या वेबपोर्टलचे पत्रकार लिमेशकुमार जंगम याला रामनगर पोलिसांनी अटक केली. जंगम याच्याविरुद्ध रामनगर पोलिसांनी खंडणी व अश्लील मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Supriya Sule
Supriya Sule : वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!
Gurpatwant Singh Pannun Assassination Plot
“सात महिन्यांपासून तुरुंगात, भारतीय दूतावासातून कोणी…”, गुरपतवंत पन्नूच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या निखिल गुप्तांची मोठी माहिती
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
anjali Damania
Anjali Damaniya : “मला रोज ७००-८०० फोन, माझ्यावर अश्लील कमेंट्स”, धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर अंजली दमानियांचा आरोप!
accused Sachin Makwana arrested in connection with theft of diamonds
दीड कोटींच्या हिरे चोरीप्रकरणी आरोपीला अटक, ९७ टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात यश
Beed Sarpanch Murder Case Valmik Karad Surrenders at CID Headquarters in Pune
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड सीआयडी पोलिसांना शरण, कार्यालयाबाहेर अखंड मराठा समाजाचं आंदोलन

नेमके काय आहे प्रकरण?

‘माय चंद्रपूर’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून पत्रकारिता करणारा लिमेशकुमर जंगम याने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बदनामी करणारा अश्लील मजकूर व्हायरल करण्याची मोहीम उघडली होती. दरम्यान, लिमेशकुमार जंगम याने बुधवारी सकाळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांच्या कुटुंबाबद्दल बदनामीकारक आणि अश्लील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून चरित्रहणन सुरू केले. याप्रकरणी जंगम याच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. विशेषतः महिलांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा-नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…

पोस्ट डिलीट करण्यासाठी मागितले ५ लाख

दुर्गापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीनिवास जंगमवार यांनी लिमेशकुमार जंगम याला फोन करून सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करण्याची विनंती केली. मात्र त्याने पोस्ट डिलीट करण्यासाठी ५ लाखाची खंडणी मागितली. एखाद्याची बदनामी करणारी पोस्ट टाकायची व नंतर पैसे मागायचे हा जंगम याचा व्यवसायच आहे. यापूर्वीदेखील त्याने अशाचप्रकारे खंडणी मागितली होती. त्या प्रकरणात तो फरार होता. काही दिवसांनंतर त्याला अटक झाली होती. जंगमने अशाप्रकारे अनेकांना त्रास दिल्याने श्रीनिवास जंगमवार यांनी थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून जंगमविरुद्ध ५ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली.

सामाजिक क्षेत्रातील महिलांकडून निषेध

प्राप्त तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी जंगमविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गाडे यांच्याशी संपर्क साधला असता, श्रीनिवास जंगमवार यांच्या तक्रारीवरून लिमेशकुमार जंगम याच्याविरुद्ध ५ लाखाची खंडणी मागितल्याची व अश्लील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. त्याच्या पोस्टमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींच्या कुटुंबाबद्दल बदनामीकारक मजकूर होता, असेही ठाणेदार गाडे यांनी सांगितले. याप्रकरणी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांकडून निषेध व्यक्त होत आहे.

Story img Loader