वर्धा : भाजपच्या महिला संघटनेच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी एका ज्येष्ठ पत्रकाराचा अपमान केला. त्यामुळे उद्या, शनिवारी त्यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व संघटनांनी घेतला आहे. भाजपला चित्रा वाघ यांची भूमिका अडचणीत येणारी ठरल्याची ही चिन्हे आहेत. उद्याच्या पत्रकार परिषदेवर मी श्रमिक पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून बहिष्कार टाकत आहे. आपणही जाऊ नये, अशी मी आपणाला विनंती करतो, असे प्रवीण धोपटे यांनी म्हटले आहे. अन्य संघटनांनी हीच भूमिका असल्याचे वृत्त आहे. सर्व संघटनांच्या या पवित्र्यामुळे भाजप पदाधिकारी चक्रावले आहेत. स्थानिक मराठी वृत्तपत्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अझीझ भाई यांनीही बहिष्कार टाकल्याचे सांगितले
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-11-2022 at 21:36 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalists boycott of chitra wagh press conference on saturday ysh