विदर्भ साहित्य संघाचा शंभराव्या वर्षांत प्रवेश; वाङ्मयप्रेमींच्या भावविश्वाशी अतुट नाते

राम भाकरे

concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
best started fillingats inviting applications for Joint Assistant in electrical department
अखेर बेस्टला मुहूर्त सापडला, विद्युतपुरवठा विभागात भरती सुरू
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
AI in archaeology
AI ने शोधले ५००० वर्षांपूर्वीचे वाळवंटाखाली दडलेले प्राचीन संस्कृतीचे रहस्य; का आहे हे तंत्र महत्त्वाचे?

नागपूर : सर्जनशीलतेतून नवकल्पनेचा जन्म व्हावा अन् याच नवकल्पनेतून समाजाला वैचारिक नेतृत्व देणाऱ्या लिहित्या हातांची संज्ञानात्मक क्षमता वुिद्धगत व्हावी, या अपेक्षेने आजपासून शंभर वर्षांआधी मकरसंक्रांतीच्या पर्वावर वऱ्हाडाच्या मातीत विदर्भ साहित्य संघाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. साहित्य संघाने या शंभर वर्षांच्या वाटचालीत हजारो वैदर्भीय प्रतिभांना त्यांच्या अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ दिले. परिणामी, ही संस्था वाङ्मयप्रेमींच्या भावविश्वाचा एक अतुट भाग झाली. साहित्य संघाच्या याच शतक महोत्सवी वाटचालीचा हा सचित्र आढावा..

साल १९२३. स्थळ अमरावती. कविभूषण प्रा. बळवंत गणेश खापर्डे यांच्या पुढाकाराने ‘विदर्भ साहित्य संघ’ नावाचे हे रोपटे पहिल्यांदा वऱ्हाडाच्या मातीत रोवले गेले. आपला सांस्कृतिक वारसा समग्र विदर्भात पोहोचवण्यासाठी विविध शहरात संमेलनांची योजना करण्यात आली. याच क्रमात  ५ फेब्रुवारी १९५० साली चंद्रपुरात भरलेल्या  १२ व्या साहित्य संमेलनामध्ये नवनिर्वाचित संघाध्यक्ष ग.त्र्यं. माडखोलकर यांनी नागपुरात विदर्भ साहित्य संघासाठी विदर्भ साहित्य मंदिर उभारण्याचे  जाहीर केले. या घोषणेला १ मार्च १९५० मध्ये स्वीकृती मिळाल्यावर अमरावतीला असलेले विदर्भ साहित्य संघाचे कार्यालय पहिल्यांदा नागपुरात आले. माडखोलकर यांनी स्वत:  सरचिटणीपदाची जबाबदारी घेतली. त्यासाठी बर्डी भागात जागा मिळवली आणि नागपुरात स्वतंत्र कार्यालय सुरू झाले.  तेव्हापासून भाषा साहित्य व कला याचा प्रभाव विदर्भात सर्वत्र जाणवू लागला. १९ ऑक्टोबर १९५२ साली त्यावेळचे मध्यप्रदेश वऱ्हाडचे मुख्यमंत्री ना. रविशंकर शुक्ल यांच्या हस्ते  विदर्भ साहित्य मंदिराचा पायाभरणी समारंभ झाला. त्यानंतर साहित्य मंदिरासाठी निधी संकलन करण्यात आले आणि साहित्य संघाची डौलदार इमारत उभी झाली. मध्यप्रदेश हिंदूी साहित्य संमेलन मोरभवनाच्या उद्घाटनासाठी पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद नागपूरला येणार होते. तोच मुहूर्त साधत २७ एप्रिल १९५४ ला विदर्भ साहित्य संघाचे उद्घाटन झाले. साहित्य संघाचे १३ वे अधिवेशन ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे झाले. नवनिर्वचित अध्यक्ष संघाच्या अध्यश्र कुसुमावती देशपांडे यांच्याकडे माडखोलकर यांनी संघाची सूत्रे दिली आणि स्वत: सरचिटणीसपदी आले. पहिल्यांदा नियुक्त  कार्यकारिणीचा विदर्भ साहित्य संघात प्रवेश झाला.

साहित्य संघाची वास्तू तयार झाल्यानंतर विदर्भात अनेक वर्षे नाटकासाठी एखादे चांगले व सुसज्ज असे नाटय़गृह नव्हते. ही अडचण दूर व्हावी यासाठी  त्यावेळी रंगमंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. १८ ऑक्टोबर १९५६ ला रंगमंदिराच्या कोनशिलाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी मध्यप्रदेश शासन व नव्या मुंबई राज्य शासनाकडून ५० हजार सानुग्रह अनुदान मिळाले. शिवाय विदर्भातील गरीब व मध्यवर्गीय जनतेने आथिर्क सहकार्य केले. त्यावेळी धनवटे यांनी मोठी मदत केली. वि.सा. संघ रंगमंदिराचे आधारस्तंभ नानासागेह जोग यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यावेळच्या कार्यकारी विश्वस्तांनी विदर्भ साहित्य संघाचे धनवटे रंग मंदिर असे नाव जाहीर केले. २९ नोव्हेंबर १९५८ ला रंगमंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी श्रीमंत पु.बा. काळे यांनी वि.सा. संघाच्या श्री शिवाजी संदर्भ ग्रथालयासाठी २३ हजारांची देणगी दिली आणि साहित्य मंदिरात १३ ऑगस्टला १९६० ला पु.बा. काळे यांच्या हस्ते ग्रंथालयाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आणि १७ ऑक्टोबर १९७७ ला ग्रंथालयाचे लोकार्पण झाले.

पुस्तकांतून दिले वैचारिक भान

गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात साहित्य संघाने केवळ ५६ पुस्तकांचे प्रकाशन केले. या शतक महोत्सवी वर्षांनिमित्त आता सहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यात वैदभिर्य संशोधन या पुस्तकाचे संपादन राजेंद्र डोळके, ८० नंतरच्या वैदर्भीय कथाकारांचे संपादन रवींद्र शोभणे, वऱ्हाडी साहित्य पुस्तकाचे  संपादन सतीश तराळ, झाडीबोली सहित्य पुस्तकाचे संपादन तीर्थराज कापगते, विदर्भ साहित्य संघाचा इतिहास या पुस्तकाचे संपादन  विलास देशपांडे आणि २००० नंतर साहित्य संमेलनाचे अध्यक्षाचे भाषणाचे खंड या पुस्तकाचे संपादन डॉ. अजय देशपांडे करणार आहेत.

शतक महोत्सवी वर्षांनिमित्त प्रस्तावित कार्यक्रम

  • एस. एल. भैरप्पा प्रकट मुलाखत
  • मॅजेस्टिक प्रकाशन व  विदर्भ  साहित्य संघाच्यावतीने मॅजेस्टिक गप्पा
  • भारतीय भाषामधील महत्त्वाचे कवीचे बहुभाषिक कवी संमेलन
  • राष्ट्रीय पातळीवर लेखिका संमेलन
  • अकोला येथे राज्य स्तरीय युवा संमेलन 
  • २०२३ साली वर्धा येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन 
  • काही महत्त्वाचे चित्रप्रदर्शन
  • साहित्य व नाटय़ सृष्टीतील महत्त्वाच्या कलावंत व साहित्यिकांच्या मुलाखती
  • दोन स्थानिक नाटय़ संस्थांची नाटके
  •   वेगवेगळय़ा जिल्ह्यात जिल्हा साहित्य संमेलन
  • नवोदितासाठी लेखन कार्यशाळा व लेखन स्पर्धा

Story img Loader