नागपूर: तेलांगणा सरकारने शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी दिली. त्यामुळे भारत राष्ट्र समिती (बीआरएस)तर्फे नागपुरातील कार्यालयात गुरूवारी जल्लोश करण्यात आली. फटाके फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.पण पावसामुळे फटाके फुटलेच नाही. कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेलांगणात मुख्यमंत्री केसीआर सरकारने शेतकऱ्यांचे १९ हजार कोटींचे कर्जमाफ केले. त्याबाबत बीआरएसचे पूर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात नागपुरातील कार्यालयात जल्लोशाचा कार्यक्रम गुरूवारी निश्चित झाला. यावेळी वाघमारे स्वत: पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह फटाके फोडायला कार्यालयाच्या बाहेर आले. परंतु उपराजधानीत दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. हे पाणी फटाक्यांवर पडल्याने निवडक फटाकेच फुटले. तर इतर फटाके वाया गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांची पंचाईत झाली. यावेळी वाघमारे म्हणाले, बीआरएसकडून तेलांगणात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले गेले. तेथे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी, हंगाम पूर्व पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये विनापरतावा मदत आणि इतरही अनेक सोयी दिल्या जातात. परंतु महाराष्ट्रात काही मिळत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक योजनांवर बोट ठेवत त्या यशस्वी नसल्याचाही आरोप वाघमारे यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jubilation by bharat rashtra samiti brs at nagpur office due to farmer loan waiver mnb 82 amy