जमिनीच्या प्रकरणात महिलेला पिस्तूल दाखवून धमकी दिल्याप्रकरणी बुधवारी ॲड. सतीश उके आणि प्रदीप उके यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने उके बंधूंची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचे नमूद करीत उके बंधूंची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

हेही वाचा >>>नागपूर : कुलगुरूंचा न्यायालयात माफीनामा !, डॉ. काशीकर प्रकरणी चपराक

Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
two unidentified men robbed gold chain from woman
बोलण्यात गुंतवून वृद्ध महिलेची सोनसाखळी पळवली
police registered case against restaurant waiter for giving impure water
डोंबिवली पलावातील हॉलमधील सेवकावर अशुध्द पाणी पिण्यास दिले म्हणून गुन्हा
Two incidents of being dragged into the trap of love revealed pune print news
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याच्या दोन घटना उघड; एक मुलगी अल्पवयीन
Rajasthan Woman Anita Chaudhary Murder
Rajasthan Woman Murder: दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा निर्घृण खून; मृतदेहाचे केले सहा तुकडे, आरोपी गुल मोहम्मदचा शोध सुरू
Alandi, Kalas village, rime News
आळंदी रस्त्यावरील कळस गावात दोन गटात हाणामारी
A young woman in Nagpur filed a molestation case against a policeman
‘युपीएससी’ची परीक्षा द्यायची आहे, विनयभंगाचा गुन्हा रद्द करा…

उके बंधू सध्या ‘ईडी’ कोठडीत मुंबईतील ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. अजनी हद्दीतील एका जमिनीप्रकरणी उके बंधूंनी फिर्यादी महिलेला पिस्तूल दाखवून धमकी दिली. त्यामुळे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी नागपूर शहर पोलिसांनी उके बंधूंना ऑर्थर रोड कारागृहातून पोलीस कोठडीच्या मागणीकरिता न्यायालयात हजर केले. मात्र, जिथून उके बंधूंना आणले त्या ठिकाणीच त्यांना घेऊन जावे, असा आदेश न्यायालयाने दिला.

हेही वाचा >>>काँग्रेसप्रणीत ‘इंटक’मध्ये फूट? ; ‘एसटी’कडे दोन गटांकडून वेगवेगळय़ा पदाधिकाऱ्यांची यादी

या प्रकरणात न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने पोलीस कोठडीची गरज नसल्याचे नमूद करीत उके बंधूंची ऑर्थर रोड कारागृहात परत न्यायालायीन कोठडीअंतर्गत रवानगी केली. न्यायालयात ॲड. सतीश उके यांनी स्वत:च आपली बाजू मांडली. प्रदीप उकेतर्फे ॲड. शशीभूषण वाहणे, ॲड. वैभव जगताप, तर सरकारतर्फे ॲड. सुबोध धर्माधिकारी यांनी बाजू मांडली.