लोकसत्ता टीम
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जूनाबाई वाघीण तिच्या दोन पिल्लांसह मस्ती करीत आहे. नागपूरचे पर्यटक कल्पक डोर्लीकर यांनी हा व्हिडिओ चित्रबद्ध केला आहे. विशेष म्हणजे वाघीण तारांचे कुंपण लांब उडी मारून पार करीत आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट या वन्य प्राण्यांसोबत इतरही वन्य प्राणी मोठ्या संख्येने आहेत. मात्र पर्यटकांना पट्टेदार वाघाचे विशेष आकर्षण आहे. या आकर्षणमुळेच गेल्या वर्षभरात ताडोबाला ४ लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिली. नागपूरचे कल्पक डोर्लीकर यांनीही नुकतीच ताडोबाला भेट दिली असता जूनाबाई या वाघिणीचा दोन पिल्लांसोबत मुक्त संचार तथा मस्ती करताना मनसोक्त दर्शन घेता आले.
आणखी वाचा-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संतापून म्हणाले, “मोक्का लावा पण यांना सोडू नका…”
ताडोबात जुनाबाई ही वाघीण गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. जूनाबाई व तिचे पिल्ले पर्यटकांना मनसोक्त दर्शन देत आहेत. कल्पक हा ताडोबात सफारी करीत असताना जुनाबाई दोन पिल्लांसोबत दिसली. जूनाबाई पिल्लांसोबत मोजमस्ती करीत होती. अशातच जंगलात तारेच्या कुंपणवरून उडी घेऊन पिल्लांना सोबत घेत ती जंगलात फेरफटका मारत दूरवर निघून जाते. कल्पक यांनी चित्रबद्ध केलेला हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे.
© The Indian Express (P) Ltd