लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अकोला : वर्षा ॠतूच्या सुरुवातीला ढगांच्या लपंडावात विविध दृश्य साकारताना खुल्या आकाशातील अनेक नजारे सुखावून जातात. पावसानंतर वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण कमी होत असल्याने या ढगांच्या पलिकडील सुंदर आकाशाचा आनंद घेता येतो. २१ जून रोजी सर्वात मोठा दिवस व लहान रात्र राहणार असल्याची माहिती खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी दिली.
२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे २१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. पृथ्वी फिरत असल्याने सूर्याचे दक्षिणोत्तर सरकणे सदैव सुरू असते. २१ जूनला नेमका कर्कवृत्तावर आल्याने नंतर त्याच्या दक्षिणेला जाण्याला दक्षिणायन म्हणतात. उत्तरायण संपून दक्षिणायनही सुरु होते. यावेळी सूर्य उत्तर गोलार्धाकडे झुकलेला असल्याने दिनमानात वाढ होत असून, २१ जून रोजी वर्षातील सर्वात मोठा दिवस सव्वा तेरा तासांचा व रात्र पावणे अकरा तासांची होते. या दिवशी सूर्यापासून सर्वाधिक उर्जा मिळते, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
आणखी वाचा-मुक्ताईमातेची पालखी निघाली विठुरायाच्या भेटीला, पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान; उद्या मलकापुरात…
२१ जून रोजी सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असतो. त्यामुळे पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा २१ जूनच्या दिवशी सूर्याच्या दिशेने सर्वाधिक कोनामध्ये कललेला असतो. यादिवशी सूर्य कर्कवृत्तात थेट डोक्यावर येतो आणि यामुळेच पृथ्वीवर या दिवशी सर्वाधिक प्रकाश पडतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा वर्षातल्या इतर दिवसांच्या तुलनेत सर्वात मोठा दिवस असतो.
अवकाशात अद्भूत ग्रह दर्शनाची पर्वणी
सूर्यमालेतील सर्वात लहान असलेला बुध ग्रह २३ जूनपासून व सर्वात तेजस्वी शुक्र ग्रह २७ जून रोजी उदित होत असल्याने सायंकाळी पश्चिम आकाशात पाहता येतील. हे दोन्ही ग्रह पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असल्याने दूर्बिणीतून आपल्याला चंद्राप्रमाणे बघता येतील. सूर्य, चंद्र व ग्रहांचा भ्रमण मार्ग अर्थात बारा राशींचे चक्र यामधील पश्चिमेस मिथून, कर्क, सिंह, कन्या, तूळ आणि अगदी विंचवासारखी दिसणारी वृश्चिक राशी पूर्व क्षितिजावरील असेल. दर दोन तासांनी एक राशी पूर्वेस उदय व एकीचा पश्चिमेस अस्त होत असून या सहा राशीतील पुनर्वसूचे कॅस्टर व पोलूक्स, कर्क राशीतील पुष्य नक्षत्र, सिंहेतील मघा, कन्या मधील चित्रा, स्वाती आदी नक्षत्र ठळक स्वरूपात बघता येतील. आकाश निरीक्षणाचा आनंद घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.