चंद्रपूर : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहुसंख्य मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शासनाकडून मागण्यांवर केवळ आश्वासनेच देण्यात आली आहे, प्रत्यक्ष कोणतीच अंमलबजावणी नाही. यामुळे संतप्त उच्च माध्यमिक शिक्षकांनी इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भाजपच्या महिला नेत्याच्या पतीने अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारावरून आत्महत्या केल्याचे उघड

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी वारंवार पत्रे देऊन आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाकडून काही दाद मिळाली नाही. शासनस्तरावर काही बैठका झाल्या होत्या. त्यात काही मागण्या मान्य ही करण्यात आल्या होत्या. मात्र त्याबाबतचे आदेश अद्यापही निघालेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे हत्यार उपसले आहे.

हेही वाचा >>> अमित शहा यांचा नागपूर दौरा आणि एकनाथ शिंदे यांना पक्ष-चिन्हांची भेट, काय आहे संबंध ?

जुनी पेन्शन योजना लागू करावी, एका दशकाहून अधिक काळ प्रलंबित उच्च माध्यमिक वर्गावरील वाढीव पदांना रुजू दिनांकापासून त्वरित मंजूरी द्यावी, १ नोव्हेंबर २००५ नंतर टप्पा अनुदानावर आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना त्वरित लागू करावी, अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यावर त्यांच्या अर्धवेळ सेवेचा कालावधी वेतनवाढ व इतर लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावा, निवडश्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी, विनाअनुदानित कडून अनुदानित मध्ये बदलीला देण्यात आलेली स्थगिती रद्द करावी, रिक्त पदे भरावीत, पटसंख्येचे निकष शाळा संहितेनुसार असावेत, निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, एम.फिल., एम.एड., पीएच.डी. धारक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकांप्रमाणे वेतन वाढ लागू करावी, डीसीपीएस किंवा एनपीएस योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशोब व देय रक्कम देण्यात यावी, उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात यावी, आदी मागण्यांची पुर्तता करावी, अशी मागणी महासंघाने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junior college teachers decided to boycott exam paper checking of class
Show comments