गुरांचा गोठा बांधकामाचे बिल मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोरेगाव पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला (कंत्राटी) अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (१४ मार्च) हिरडामाली येथील मिथून पान सेंटर येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. जगदीश सदाशिव रहांगडाले असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर: डॉ. आंबेडकर भवन पाडल्याचा मुद्दा विधानसभेत

तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२१-२२ मध्ये गोठा बांधकामाकरिता ७७ हजार रुपये अनुदान मंजूर झाले होते. त्यानुसार तक्रारदाराने फेब्रुवारी २०२३ मध्ये गोठ्याचे बांधकाम पूर्ण केले. दरम्यान, बांधकाम व बांधकामाच्या बिलाची तपासणी करून बरोबर असल्याचा शेरा नमूद करून बिल मंजुरीसाठी पाठविण्याकरिता कनिष्ठ अभियंता रहांगडाले याने तक्रारदाराकडून यापूर्वी पाच हजार रुपये घेतले. आणखी तीन हजार रुपयांची मागणी केली. परंतु, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाच्या पथकाने सोमवारी पडताळणी केली. यावेळी आरोपी जगदीश रहांगडाले याने तक्रारदाराला तडजोडीअंती दोन हजार रुपये व कोंबड्याचं जेवण मागितल्याच स्पष्ट झाले. दरम्यान, पथकाने मंगळवारी हिरडामाली येथील मिथून पान सेंटर येथे तक्रारदाराकडून कनिष्ठ अभियंता रहांगडाले याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junior engineer of goregaon panchayat samiti arrested while accepting bribe sar 75 amy