लोकसत्‍ता टीम

अमरावती : परकीय चलनाऐवजी कागदाचे बंडल देऊन फसवणूक करण्‍याचा प्रकार समोर आला असून एका व्यावसायिकाची बॅगमध्ये चक्क रद्दी कागद देऊन फसवणूक करण्‍यात आली. ही घटना दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी

शिवकुमार (४०), राकेश (३५) व ५५ वर्षीय महिला सर्व रा. कोलकता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दर्यापुरातील पंजाबराव कॉलनी येथील रहिवासी उमेश सुरेश गावंडे (३८) यांचे शहरातच सेतू व मिनी बँक ऑनलाइन सेंटर आहे. उमेश गावंडे हे आपल्या सेंटरवर असताना शिवकुमार हा त्यांच्याकडे गेला. माझ्याकडे परकीय चलन आहे, त्या भारतीय चलनात बदलून देता का, अशी विचारणा त्याने उमेश यांना केली.

आणखी वाचा-अकोला : माथाडी कामगार आर्थिक अडचणीत, १६ वर्षांपासून…

उमेश यांनी त्याला होकार दिला. त्यानंतर शिवकुमार याचे साथीदार राकेश व एक महिला हे दोघे उमेश यांना भेटले. विदेशी नोटा देण्यासाठी त्यांनी उमेश यांच्याकडून ५० हजार रुपये रोख दिले. त्याचवेळी त्या दोघांनी उमेश यांना एक कॉलेज बॅग दिली. त्या बॅगमध्ये परकीय चलन असल्याचे सांगून ते दोघे तेथून निघून गेले. दरम्यान, तेथून काही अंतरावर जाऊन उमेश यांनी बॅग उघडून पाहिल्यावर त्यात परकीय चलनाऐवजी रद्दी कागद असल्याचे त्यांना दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर उमेश यांनी दर्यापूर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

४.५५ किलो गांजासह दोन तस्कर जेरबंद

दुचाकीवरून गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना धारणी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४ किलो ५५ ग्रॅम गांजा व दुचाकी असा एकूण १ लाख ४२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आणखी वाचा-नागपूर : ‘फॉरेन्सिक सायन्स’ विभागाच्या दुरवस्थेवर न्यायालयाची नाराजी, विचारले, गुन्हेगारांना शिक्षा कशी द्यायची?

संजय गोपाळराव इंगळे (५२) रा. इंदिरानगर, हिवरखेड, अकोला व शेख सलमान शेख ईसा (३२) रा. तिडके प्लॉट, हिवरखेड, अकोला अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. संजय व शेख सलमान हे दोघे दुचाकीवरून गांजा तस्करी करीत होते. याबाबत धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धारणी-कुसूमकोट बु. मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी दुचाकी क्रमांक एमएच ३० बीटी २९४३ वरून आलेल्या संजय व शेख सलमान यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत त्यांच्याजवळ ४ किलो ५५ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानुसार त्यांना अटक करून गांजा व दुचाकी असा एकूण १ लाख ४२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध धारणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.