लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : परकीय चलनाऐवजी कागदाचे बंडल देऊन फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला असून एका व्यावसायिकाची बॅगमध्ये चक्क रद्दी कागद देऊन फसवणूक करण्यात आली. ही घटना दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवकुमार (४०), राकेश (३५) व ५५ वर्षीय महिला सर्व रा. कोलकता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दर्यापुरातील पंजाबराव कॉलनी येथील रहिवासी उमेश सुरेश गावंडे (३८) यांचे शहरातच सेतू व मिनी बँक ऑनलाइन सेंटर आहे. उमेश गावंडे हे आपल्या सेंटरवर असताना शिवकुमार हा त्यांच्याकडे गेला. माझ्याकडे परकीय चलन आहे, त्या भारतीय चलनात बदलून देता का, अशी विचारणा त्याने उमेश यांना केली.
आणखी वाचा-अकोला : माथाडी कामगार आर्थिक अडचणीत, १६ वर्षांपासून…
उमेश यांनी त्याला होकार दिला. त्यानंतर शिवकुमार याचे साथीदार राकेश व एक महिला हे दोघे उमेश यांना भेटले. विदेशी नोटा देण्यासाठी त्यांनी उमेश यांच्याकडून ५० हजार रुपये रोख दिले. त्याचवेळी त्या दोघांनी उमेश यांना एक कॉलेज बॅग दिली. त्या बॅगमध्ये परकीय चलन असल्याचे सांगून ते दोघे तेथून निघून गेले. दरम्यान, तेथून काही अंतरावर जाऊन उमेश यांनी बॅग उघडून पाहिल्यावर त्यात परकीय चलनाऐवजी रद्दी कागद असल्याचे त्यांना दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर उमेश यांनी दर्यापूर ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
४.५५ किलो गांजासह दोन तस्कर जेरबंद
दुचाकीवरून गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना धारणी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४ किलो ५५ ग्रॅम गांजा व दुचाकी असा एकूण १ लाख ४२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संजय गोपाळराव इंगळे (५२) रा. इंदिरानगर, हिवरखेड, अकोला व शेख सलमान शेख ईसा (३२) रा. तिडके प्लॉट, हिवरखेड, अकोला अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. संजय व शेख सलमान हे दोघे दुचाकीवरून गांजा तस्करी करीत होते. याबाबत धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धारणी-कुसूमकोट बु. मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी दुचाकी क्रमांक एमएच ३० बीटी २९४३ वरून आलेल्या संजय व शेख सलमान यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत त्यांच्याजवळ ४ किलो ५५ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानुसार त्यांना अटक करून गांजा व दुचाकी असा एकूण १ लाख ४२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध धारणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.