अमरावती : सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू हा सूर्याशी प्रतियुतीत येत असून येत्‍या ३ नोव्‍हेंबरला तो पृथ्वीच्या सर्वांत जवळ पाहायला मिळणार आहे, अशी माहिती येथील खगोल अभ्‍यासकांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पृथ्वीपासून गुरूचे सरासरी अंतर ९३ कोटी किमी आहे. गुरूचा व्यास १,४२,८०० किमी आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास ११.८६ वर्षे लागतात. गुरूला एकूण ७९ चंद्र आहेत. टेलिस्कोपमधून गुरूचे निरीक्षण केले असता गुरूवरचा पट्टा व चार चंद्र दिसतात. ७ डिसेंबर १९९५ रोजी मानवविरहित यान ‘गॅलिलिओ’ गुरूवर पोहोचले. गुरूवर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही.

हेही वाचा – वर्धा : सहकारी सूतगिरणीवर माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख गटाचा झेंडा

३ नोव्हेंबरला सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू, ग्रह क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असल्याने तो सहज ओळखता येईल व साध्या डोळ्याने पाहता येणार आहे. ग्रेट रेड स्पॉट, युरोपा, गॅनिमीड, आयोव कॅलेस्टो हे गुरूचे चार चंद्र मात्र साध्या डोळ्याने दिसू शकणार नाही. यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

हेही वाचा – बुलढाणा : ‘लम्पी’ आटोक्यात, प्राण्यांची वाहतूक व बाजारास मुभा; ३ महिन्यांपासून होती बंदी

पृथ्वीपेक्षा गुरू हा ११.२५ पट मोठा आहे. रक्तरंगी ठिपका हे गुरूचे खास वैशिष्ट्य, ‘ग्रेट रेड स्पॉट’ या नावाने हा ठिपका ओळखला जातो. ४० हजार किमी लांब १४ हजार किमी रुंदीचा हा अवाढव्य ठिपका आहे. या ठिपक्याचे निरीक्षण केले असता ते एक प्रचंड चक्रीवादळ असल्याचे सहज लक्षात येईल. गुरूवर घोंघावणारे चक्रीवादळ एका विशिष्ट ठिकाणीच का निर्माण झाले, याचे कारण मात्र अजूनही अज्ञात असल्याचे गिरूळकर यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jupiter will come closest to earth when and how can be seen find out mma 73 ssb