भारत राष्ट्र समितीचा (बीआरएस) देशपातळीवर विस्तार होत आहे. विदर्भात पक्ष विस्ताराच्या दृष्टीने नागपुरात बीआरएसच्या महाराष्ट्रातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएसचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते १५ जून रोजी होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात बीएरएसचे पाहिले कार्यालय सुरू होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्ता उदघाटननिमित्त नागपुरात कार्यकर्ता मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> शेगावातील सोनारास गंडविणारा संभाजीनगरचा ठगसेन गजाआड; आरोपीचे मराठवाडा कनेक्शन

या दौऱ्याच्या निमित्ताने नागपूर शहरात ठिकठिकाणी ‘अब की बार किसान सरकार’चा नारा गुंजनार आहे. दरम्यान, मंगकवरी चेन्नुर विधानसभेचे  आमदार बलका सुमन यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. नियोजित कार्यक्रमानुसार १५ जूनला दुपारी १ वाजता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नागपूर विमानतळावर पोहचतील. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता  बीआरएस पक्ष, महाराष्ट्र कार्यालयाचे उद्घाटन प्लॉट नंबर १४, रामकृष्ण नगर, साई मंदिराजवळ, वर्धा रोड येथे होईल. दुपारी २ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे कार्यकर्ता मेळावा होणार असून, विदर्भातील विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होईल.  त्यानंतर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सभेला संबोधित करतील, अशी माहिती भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर यांनी दिली.