चंद्रपूरमधील दक्षिण ब्रम्हपुरीच्या आवळगाव परिसरातील कक्ष क्रमांक १०४७ मध्ये ‘के-४’ या नर वाघाने धुमाकूळ घालून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. या वाघाने नागरिकांवर हल्ला सुद्धा केला आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी वनविभागाचे पथक, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शॉर्पशुटर अजय मराठे यांनी वाघाला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन दिले. त्यानंतर वाघ बेशुद्ध झाल्यानंतर सायंकाळी ७.२२ वाजताच्या सुमारास वाघाला सुरक्षितरित्या पिजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे.

हेही वाचा- बाळ विक्री करणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे भंडाऱ्यापर्यंत; चौघांवर गुन्हा दाखल

Maharashtra tiger deaths
Tiger Deaths : राज्यात १० दिवसांत पाच वाघ मृत्युमुखी…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Permanent ban on feeding chicken meat to tigers in Nagpur
नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी…‘एच-५एन-१’ विषाणूमुळे…
is Tiger hunt in yavatmal Decomposed body found in Ukani coal mine
वाघाची शिकार? उकणी कोळसा खाणीत कुजलेला मृतदेह आढळला; १३ नखे व दोन दात…
tiger cut into three pieces bhandara
भंडारा : खळबळजनक! वाघाचे तीन तुकडे करून जंगलात फेकले, शिकार की झुंज…
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
H5N1 tigers, tigers, zoos , tiger news, tiger latest news,
“एच५एन१” ने तीन वाघ मृत्युमुखी, राज्यातील प्राणिसंग्रहालयांना “हाय अलर्ट”
tiger Karhandla , Karhandla Sanctuary,
VIDEO : कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अडवला वाघाचा रस्ता, शिक्षा मात्र…

जेरबंद करण्यात आलेला के-४ हा नर वाघ दोन ते अडीच वर्षांचा असून त्याला चंद्रपूर येथील प्राणी बचाव केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही कारवाई सहायक वनसंरक्षक के.आर. धोंडणे, वनक्षेत्रपाल आर.डी. शेंडे, यांच्यासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. ब्रम्हपुरी वनविभागातील दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील आवळगाव शेतशिवारात ‘के-४’ या नर वाघाने धुमाकूळ घालून अनेकांना जखमी केले होते. ब्रम्हपुरी वनविभागाच्या पथकाने अखेर त्याला जाळ्यात अडकवून बेशुद्धीचे इंजेक्शन देत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

Story img Loader