लोकसत्ता टीम

अमरावती: ओटीटी माध्यमावर सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या ‘फर्जी’ या वेबसीरिजमध्ये अमरावतीच्या १२ वर्षीय कबीर शाहने दमदार प्रवेश करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. या वेबसीरिजमध्ये कबीरने बालपणीच्या ‘फिरोज’ची भूमिका साकारली असून, त्याच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

कबीर हा वलगाव मार्गावरील हबीबनगरचा मूळ रहिवासी आहे. अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण कबीरने घेतलेले नाही. आपल्या अंगभूत कलेच्‍या बळावर वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षापासूनच त्याला अभिनयक्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. कबीरने अभिनय केलेल्या विविध उत्पादन वस्तूंच्या जाहिराती, माहितीपट, लघुपट लक्षवेधी ठरले आहेत.

आणखी वाचा- बुलढाणा: एकाच वेळी ८० खेळाडूंच्या ‘बुद्धि-बळा’चा कस

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘नामकरण’, ‘जाना ना दिल से दूर’ या मालिकेतील ‘माधव’ची भूमिका, ‘इस प्यार को क्या नाम दू-३’ या मालिकेत ‘आदि’ तर ‘सोनी’ या वाहिनीवरील ‘पृथ्वी वल्लभ’ या मालिकेत कबीरने बाल ‘तैलप’ची भूमिका साकारली आहे. याशिवाय, अभिनेता अजय देवगणसह ‘बॉडी वार्मर’च्या जाहिरातीतही कबीर झळकला आहे. भविष्यात कबीर ‘नेटफ्लिक्स’च्या एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. कबीरचे अलीकडेच एका मोठ्या चित्रपटातील भूमिकेसाठी चित्रीकरण पूर्ण झालेले आहे.

‘फर्जी’ या वेबसीरिजमध्ये शाहीद कपूर आणि दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपती हे प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर अमोल पालेकर, केके मेनन, रेजिना कॅसांड्रा, कुब्ब्रा सैत, राशी खन्ना यांच्याही भूमिका आहेत. या दिग्गज कलाकारांसोबत कबीरने साकारलेल्या बाल ‘फिरोज’ या भूमिकेचे ’फर्जी’चे दिग्दर्शक तसेच सहकारी कलाकारांनी कौतुक केले आहे.

आणखी वाचा- सावधान! शासकीय नोकरीच्या नावावर फसवणारी टोळी सक्रीय

कबीर शाह याला बालपणापासून अभिनयाची आवड होती. त्‍याला त्‍याच्‍या पालकांनी प्रोत्‍साहन दिले. कबीरने अभिनयाचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नसले, तरी त्‍याने आपल्‍या कलेच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. चित्रपट सृष्‍टीतील अनेक दिग्‍गज अभिनेत्‍यांसोबत काम करण्‍याची संधी त्‍याला मिळाली आहे.

Story img Loader