‘डोळे’ ही इश्वराने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी. आताच्या काळात ‘अमृत’ पिऊन अमरत्व प्राप्त करता येत नसले तरी आयुष्यात आपण केलेली चांगली कामे मरणानंतरही अमरत्व प्राप्त करून देतात! याचेच उदाहरण म्हणजे कलाबाई निंबाळकर. “मरावे परि दृष्टी रूपे उरावे” याचा प्रत्यय देऊळगाव राजा येथील आदर्श कॉलनीमधील रहिवासी कलाबाई निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कृतीतून आला. सौंदर्याने भरलेली सृष्टी पाहण्यासाठी कलाबाईंच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे दोन अंधांना दृष्टी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलाबाईंचे मरणोत्तर नेत्रदान करवून घेत निंबाळकर कुटुंबाने यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. आईचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय मुलगा कैलास निंबाळकर यांनी घेतला. जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक काबरा व माजी अध्यक्ष सन्मती जैन यांच्या सोबत संपर्क साधून आपला निर्णय सांगितला. या दोघांनी निर्णयाचे स्वागत करून तत्काळ कारवाई केली. जालना येथील गणपती नेत्रालयाच्या चमूने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली.
कलाबाई यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. नेत्रदान हे श्रेष्ठदान असून या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळणार असल्याचे समाजसेवी सन्मती जैन यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalabai posthumous eye donation gives sight to two blind people scm 61 amy
Show comments