नागपूर : नव्यानेच लग्न होऊन घरात आलेल्या सुनेला महागडे कपडे दागिने आणि पार्ट्या करण्याची सवय होती मात्र लग्न झाल्यानंतर सासरी घरकाम सासू-सासर्‍यांची सेवा यामध्येच तिचा वेळ जात होता. शिवाय पूर्वीसारखे तिच्याकडे पैसेही राहत नव्हते. त्यामुळे सुनेने आपल्या खास मित्राला घरी बोलावून स्वतःच्या घरात दरोडा टाकण्याचा कट रचला. कटानुसार मित्राच्या मदतीने सासुला घरात बांधून दागिने आणि रक्कम पळविल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी घरात घुसून मारहाण आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या पथकाने तीन तासात या गुन्ह्याचा उलगडा केला. तीन लाख रोख, पन्नास ग्रॅम सोन्याचे आणि ६०० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. या जबरी चोरीचा गीताच्या सुनेनीच कट रचल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी अज्ञात युवक युवती आणि सुनेला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत सखोल चौकशी सुरू होती.

धरमनगरातील रहिवासी फिर्यादी गीता (४८) यांना एक मुलगा आहे.तो विवाहित आहे. गीताचे धरमनगरात दुमजली आहे. वरच्या मजल्यावर मुलगा आणि सुन राहाते तर खाली फिर्यादी गीता पतीसोबत राहतात. गीताचे पती आणि मुलगा खाजगी काम करतो.घटनेच्या वेळी म्हणजे सोमवारी गीताचे पती आणि मुलगा कामाला गेले होते. घरात गीता आणि त्यांची सुन या दोघ्याच जनी होत्या. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास एक युवक आणि एक युवती घरात आली. त्यांनी आधी सुनेला वरच्या माळ्यावर बांधून ठेवले नंतर खाली गीताचे टन दाबून तिलाही ओढनीने बांधले. नंतर कपाटातील दागिने, रोख रक्कम असा जवळपास चार ते पाच लाखांचा मुद्देमाल पिशवीत भरला आणि पळ काढला.

आरोपी पळून गेल्यानंतर गीताच्या सुनेनी स्व:तची सुटका केली नंतर सासुलाही सोडविले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.सासू सुनेची आस्थेनी विचारपूस केली. गीताच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेतन कदम कळमना ठाण्यात पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने जवळपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले.आरोपीचे वाहन सीसीटीव्ही कैद झाले होते. वाहनाच्या नंबरवरून तीन तासात शोध घेतला. सखोल चौकशी करून त्यांच्याकडू तीन लाख रोख, सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. घटनेमुळे गीताचे पती आणि मुलगा यांना धक्का बसला असून ते चिंतेत आहेत.

असा झाला उलगडा

पोलिसांनी वाहनाच्या नंबरवरून जबरीने चोरीसाठी आलेल्या दोघांना तीन तासात हुडकून काढले. सखोल चौकशीत या प्रकरणाची मुख्य सुत्रधार गीताची सून असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने स्व:तलाही बांधून ठेवल्याचा बनाव केला. सून आणि तिचा मित्र यांनी मिळून चोरीचा कट रचला. हा संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर सासूच्या पायाखालची वाळू सरकली.

Story img Loader