नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला व राहुल गांधी यांच्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या कलावती यांनी रविवारी काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभागी होत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना खडे बोल सुनावले. विदर्भात सर्वाधिक आत्महत्या होत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील या कलावती आहेत. त्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातून येतात. २००८ मध्ये केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार असताना राहुल गांधी यांनी कलावती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती व त्यांची परिस्थिती समजून घेतली होती.

हेही वाचा >>> शिक्षकच शाळेत शिकवण्याचा कंटाळा करत असतील तर… शिक्षक संघटना म्हणतात आमचे ‘हे’ काम नाही

Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
vasai naigaon marathi news
वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
Bed Sheet production in Solapur
सोलापूरच्या चादर व्यवसायाचे पानिपत!
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?

या घटनेची खुप चर्चा झाली होती. राहुल यांच्या प्रयत्नांमुळे कलावती यांना सरकारी योजनांचा लाभ झाला. व्यक्तिगतपातळीवरही त्यांना राहुल यांच्याकडून मदत झाली होती.नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी याच घटनेचा उल्लेख करीत कलावती यांना राहुल गांधी यांनी नव्हे तर भाजप सरकारने मदत केल्याचा दावा केला होता. त्यामुळे कलावती पुन्हा एकदा चर्चेत आल्या. कलावती यांनी दुसऱ्याच दिवशी शाहा यांचा दावा खोढून काढला होता. रविवारी नागपुरात राजीव गांधी यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह कलावतीही सहभागी झाल्या. आणि त्यांनी येथे पुन्हा अमित शाहा याना खडेबोल सुनावले. त्या म्हणाल्या “ अमित शाह खोटे बोलत आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांना मदत केल्यानेच मुलीचा विवाह पार पडला. यावेळी कलावती यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष अर्पण करून त्यांना अभिवादन केले व गांधी कुटुंबीयांप्रति कृतज्ञताही व्यक्त केली.

Story img Loader