नागपूर : वैष्णोदेवी नगर परिसरात एका घरातून कळमना पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. रमानंद धुर्वे (२७) रा. वैष्णोदेवीनगर, शिवशक्ती बियर बारच्या मागे असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी धुर्वे याच्या घरावर छापा मारला. यावेळी घरात १ रिव्हॉल्वर, ३ देशी बनावटीचे कट्टे, १३ जिवंत काडतुसे, ६ रिकाम्या काडतूस, १ एअर गन, ३ तलवारी, २ चाकू, १ भाल्याचा पत्ता, १ फायटर, १ छोटे गॅस भरण्याची रिफिल, १ लोखंड गरम करण्याचे सिलेंडर, ४ नग लहान कागदी बाॅक्स बारूद, १०८ एअरगनचे छर्रे मिळाले. हे बघून पोलीस थक्क झाले.

हेही वाचा – भंडारा : जनावरे चारण्यासाठी जंगलात गेला, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक…

पोलिसांनी रमानंद याला अटक करून सर्व साहित्य जप्त केले गेले. प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपी रामानंदने २०१७ मध्ये त्याला ही सर्व शस्त्रे रेल्वे ट्रॅकजवळ सापडल्याचे सांगितले. आरोपी खरे बोलत आहे की त्याने विशिष्ट उद्देशाने हे शस्त्र गोळा केले, याबाबत तपास सुरू आहे.