कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी कामगार सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन करतांना राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले की कामगारांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार आहे.वर्धा जिल्ह्यात प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास भवन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्या जाईल.कामगारांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी आवश्यक ठरते.म्हणून तालुका स्तरावर लवकरच कामगार नोंदणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> बुलढाणा: काँग्रेसच्या भिडे विरोधी आंदोलनात बसवर दगडफेक
गत वर्षात राज्यात दहा लाख कामगारांची नोंदणी झाली आहे.कामगारांच्या कुटुंबासाठी विमा पॉलिसी सुरू करण्यात येत आहे.त्यांना सन्मान मिळावा म्हणून विविध योजना सुरू करण्यात येत असल्याचे डॉ.सुरेश खाडे म्हणाले.कामगार कुटुंबास मोफत आरोग्य सुविधा मिळावी म्हणून केंद्र शासनातर्फे कामगार रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.कामगार विभाग रिक्त असलेल्या जागा भरण्याची सूचना करीत आमदार डॉ.पंकज भोयर यांनी ३ हजार ४३४ कामगारांना विविध योजनांचा लाभ या सप्ताहात देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.विविध योजनेतील कर्ज घेवून आपला व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.यावेळी कामगार आयुक्त नितीन पाटणकर,नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, कामगार नेते मिलिंद देशपांडे, प्रशांत बुरले प्रामुख्याने उपस्थित होते.