लोकसत्ता टीम
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य वेगळे का झाले नाही, तर माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी सगळे मराठी भाषिक प्रांत एकत्र आले पाहिजे अशी भूमिका मांडली आणि त्याला कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांनी पाठींबा दिला होता. देशात त्यावेळी युद्धाचे वातावरण होते , तेव्हा कन्नमवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने ७ कोटी जमा करून दिले होते. माजी मुख्यमंत्री कन्नमवार ध्येयवादी नेते होते असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्थानिक इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री शोभा फडणवीस, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार देवराव भोंगळे, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आयुक्त विपीन पालीवाल, प्राचार्य डॉ.अशोक जीवतोडे उपस्थित होते.
आणखी वाचा-विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघडकीस… रामटेकच्या राईस मिलमध्ये…
फडणवीस म्हणाले, लोकनेते कन्नमवार यांच्या शतकोत्तर जयंतीला उपस्थिती राहण्याचे भाग्य लाभले याचा आनंद आहे. राज्याचा विकास ध्यास घेऊन व्रतस्थ नेता अशी कन्नमवार यांची ओळख आहे. नव्या पिढीला हे माहीत झाले पाहिजे. दादासाहेब कन्नमवार धयवादी नेते होते. आरोग्य सेवा साठी दादासाहेब कन्नमवार यांचे काम मोठे आहे , शिक्षणाच्या क्षेत्रात अनेकांना प्रेरित केले . दादासाहेबांचे चरित्र प्रेरणादायी, म्हणूनच त्यांना आपण कर्मवीर म्हणतो. मूल , चंद्रपूर सोबत नाळ जुळली आहे. आई महाकाली चा आशीर्वाद घेतला. वडेट्टीवार, जोरगेवार यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या आपण सर्वांनी पूर्ण करू. दादासाहेब कन्नमवार यांचे काम पुढच्या पिढीला पोहचवण्यासाठी काम करू, त्यांच्या कार्याचा गौरवग्रंथ काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना विनंती करणार आहे असेही फडणवीस म्हणाले.