वर्धा : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराडा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ प्रवाश्यांचा जळून मृत्यू झाला. सेलू तालुक्यातील झडशी येथील करण बुधबावरे हा तरुण पुण्यात निवासी आपल्या बहिणीला आणायला त्या दुर्दैवी बसमध्ये बसला.
वडिलांचे अकाली निधन झाल्याने करण अनुकंपा तत्वावर पोस्ट खात्यात वर्षापूर्वी नोकरीस लागला होता. त्यापूर्वी नोकरी नाही म्हणून त्याने ऑटोमोबाईल दुकानात काम केले. उन्हाळ्यातच त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. या आखाडीस तिला माहेरी आणायला तो निघाला. पण वाटेतच संकट डोकावले. उत्तम ढोलकीपटू म्हणून ख्याती असलेल्या करणच्या ढोलकीचा नाद अनेकांना आठवत आहे.