नागपूर : राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरी वादनाचे जनक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांना कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘कर्मश्री दुर्गादास रक्षक सेवाव्रती पुरस्कार’ जाहीर झाला आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्नेही श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक, दुर्गादास रक्षक यांचा ४ ऑगस्ट हा स्मृतीदिन आहे. श्रीगुरुदेव मानव मंदिर येरलाचे,( जि. नागपूर) दुर्गादास रक्षक शिल्पकार होते. नागपूर श्रीगुरुदेव सेवाश्रम आणि गुरुकुंजातील दास टेकडीवरील विश्वमानव मंदिर- रामकृष्णहरी मंदिराच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या स्मरणार्थ ‘कर्मश्री दुर्गादास रक्षक सेवाव्रती पुरस्कार’ कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिल्या जातो.या आधी या पुरस्काराचे मानकरी आचार्य हरीभाऊ वेरूळकर, डॉ. सतिश गोगुलवार, डॉ. गिरीश गांधी हे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्यपाल महाराज चिंचोळकर यांना हा पुरस्कार ५ ऑगस्ट २०२३ ला दुपारी १ वाजता प्रदान करण्यात येणार आहे. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र दाभा, नागपूर येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी आणि वरिष्ठ पत्रकार विकास झाडे यांची उपस्थिती राहतील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karmashri durgadas rakshak smriti award announced to satyapal maharaj rbt 74 amy