बुलढाणा: विदर्भ पंढरी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानासह श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत कार्तिक एकादशी सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा झाला. कार्तिकीनिमित्त संतनगरी शेगावात हजारो आबालवृद्ध भाविकांची मांदियाळी दिसून आली. श्रींचे मंदिरात ५० हजाराचेवर भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. ३० हजारावर भक्तांनी संस्थानच्या मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
श्रीं च्या दर्शनासाठी प्रत्यक्ष दर्शन आणि मुख दर्शनासाठी जिल्ह्यासह दूरवरून आलेल्या भाविकांच्या पहाटे पासून दीर्घ रांगा लागल्याचे दिसून आले. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाऊ न शकणारे भाविक शेगावी येऊन गजानन महाराजांचे दर्शन घेतात. यंदाही ही परंपरा कायम राहिली. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची आणि महाप्रसादची शेगाव संस्थांनच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सुविधेसाठी शेकडो सेवेकरी तैनात करण्यात आले होते.शेगाव शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा >>>Navneet Rana: अडसूळ पिता-पुत्रावर नवनीत राणांची शेलक्या शब्दात टीका, म्हणाल्या “दीडफुट्या ,चारफुट्या…बाहेरचे पार्सल”
पंढरपूर शाखेत सव्वा लाख भाविकांना महाप्रसाद
श्री क्षेत्र पंढरपूर शाखेव्दारा श्री गजानन महाराज मठामध्ये दशमी, एकादशी व बारस या कालावधीत १ लाख १९ हजारावर भक्तांना महाप्रसाद वितरीत करण्यात आला. तसेच वारी निमित्त पंढरपूर शाखेत आलेल्या ७४ दिंड्यांपैकी नियमाची पूर्तता केलेल्या ७० भजनी दिंड्यांना भजन साहित्यासह वाद्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी धर्मार्थ अॅलोपॅथीक रूग्णालयाचे माध्यमातून ६००० भाविकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत संस्थेव्दारा शेगांव, पंढरपूर, आळंदी व त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा अशा ९ राज्यामधील ७७ जिल्ह्यातून आलेल्या २० हजार १७७ गावांना भजनी साहित्य वितरण करण्यात आले आहे. शाखेत भाविकांसाठी भक्तनिवासात निवास व भोजनप्रसादाची व्यवस्था कार्यरत आहे. शिवाय रात्री उशीरा येणाऱ्या भक्तांसाठी सुद्धा महाप्रसादाचे विनामुल्य वितरण करण्यात येते. तसेच श्री प्रगटदिन, श्रीरामनवमी व श्री ५०० विद्यार्थ्यांना दररोज माधुकरीचे वितरण देखील करण्यात येते. कार्तिक व आषाढी वारीचे वेळेस महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या व नियमांची पूर्तता केलेल्या भजनी दिंड्यांना १० टाळजोड, १ विणा, १ मृदंग, १ हातोडी असे भजनी साहित्य व श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज गाथा व श्री एकनाथी भागवत या संत वाद्यांचे वितरण करण्यात येते.