लोकसत्ता टीम

बुलढाणा : लाखावर भाविकांची मांदियाळी, विठुमाऊली व गजानन महाराजांचा जयघोष, टाळ मृदुंगाच्या तालामुळे दुमदुमनारा मंदिर परिसर आणि श्रींचा पालखी सोहळा, यामुळे संतनगरी शेगाव येथे आज, गुरुवारी पंढरी अवतरल्याचे चित्र होते.

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
Monthly Numerology November 2024 horoscope
Numerology: नोव्हेंबर महिन्यात ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना मिळणार फायदा, जाणून घ्या मासिक अंक राशी भविष्य
lakhat ek aamcha dada
शत्रूचा प्लॅन फसणार, तुळजाला ‘त्या’ युक्तीसाठी डॅडींकडून शाबासकीची थाप मिळणार; पाहा ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवा प्रोमो
Madhuri Dixit And Kartik Aryan dance at promotion of Bhool Bhulaiyaa 3 movie
Video: ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

संत नगरी शेगावात लाखावर भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी कार्तिक एकादशीचा सोहळा उत्साहात पार पडला. संध्याकाळी कार्तिक एकादशीनिमित्त श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा काढण्यात आली. भाविकांनी श्रींच्या रजत मुखवट्याचे दर्शन घेतले.

आणखी वाचा-दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी तमाशा मंडळाच्या मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; धामणगाव बढे पोलिसांची कारवाई

सकाळी ४ वाजतापासूनच गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. श्रींच्या समाधी मंदिर दर्शनासाठी ३ तास लागत होते तर श्रींच्या मुखदर्शनासाठी पाऊण तास लागत होता. संध्याकाळी ५ वाजता टाळ, मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात श्रींची पालखी मंदिर परिक्रमेसाठी मार्गस्थ झाली. टाळकरी, पताकाधारी वारकऱ्यांचा सहभाग पालखी सोवत होता. संस्थानच्यावतीने श्रींच्या रजत मुखवट्याचे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री विठ्ठलाच्या तैलचित्राचे पूजन करण्यात आले. सूर्य मावळतीला जात असताना पालखी मंदिरात दाखल झाली. श्रींच्या पालखीचीही आरती करण्यात आली.

भाविकांना फराळ

स्वंयसेवी व सामाजिक संस्थांच्यावतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांना फराळ, चहा, केळी व पाण्याचे वाटप करण्यात आले. मंदिरात ६० हजारावर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. एकादशीमुळे साबुदाणा उसळ, आमटी, भगर, केळी, नायलॉन चिवडा असा महाप्रसादाचा बेत होता.