माझी आई सुद्धा योग प्रचार,प्रसाराचे काम करायची. मलाही योग करायला सांगायची. पण तेव्हा त्याचे महत्व कळले नाही. पण जेव्हा मी आजारी पडलो, तेव्हापासून  मी योगाकडे वळलो.आज योगामुळेच माझी तब्येत ठणठणीत आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथील कस्तुरचंद पार्कवर आयोजित योगदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. ते म्हणाले,

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मला एका कार्यक्रमात विचारल की, तुम्ही  फिटनेससाठी काय करता .दहा वर्ष तुमचे वय कमी वाटते. मी त्यांना सांगितले की मी नियमितपणे एक तास योग करतो. आज अनेक भारतीय विदेशात योगाचे धडे देतात त्यातून त्यांना उत्पन्न मिळते.सर्वांनी रोज योगा केला तर प्रकृती उत्तम राहील. दोन वर्षे  करोनामुळे योगदिन साजरा करता आला नाही. पंतप्रधानांची योग दिनाची संकल्पना सर्व दूर पोहचली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasturchand park nitin gadkari yoga day nagpur amy