नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणात आता राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. देशमुख यांचे पुत्र आणि काटोल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सलील देशमुख यांनी या प्रकरणात थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला झाल्यानंतर त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या काटोल मतदारसंघासोबत नागपूर व राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटल्या आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मतदानाच्या काही दिवसाआधी असा हल्ला होणे याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस क्षाचे राष्ट्री अध्यक्ष शरद पवार, पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी या प्रकरणावर देशमुख यांचे पुत्र सलील यांनी पहिली प्रतिक्रिया वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना दिली. त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.  ते म्हणाले, आजपर्यंत काटोल मध्ये असा प्रकार घडला नाही. इतकी मस्ती सध्या काही लोकांची वाढली, जिल्ह्याला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्ताधाऱ्याच्याआशीर्वादातूनच हे सर्व घडत आहे. याचा जाब शासनकर्त्यांना विचारला जावा.

हेही वाचा >>>प्रचार संपवून परत येताना कशी घडली घटना! अनिल देशमुखांवर हल्ला प्रकरणात काय म्हणतात पोलीस?

घडलेल्या घटनेची माहिती देताना सलील म्हणाले, अनिल देशमुख प्रचार संपवून परत येत होते. त्यांच्या गाडीत दोघेजण होते. सुरक्षा रक्षकाचे वाहन मागे होते. त्यावेळी हा हल्ला झाला. त्यांच्या मानेला व डोक्याला दुखापत आहे. सीटी स्कॅननंतर या जखमांची तीव्रता कळेल असे ते म्हणाले.

भाजपच्या आरोपावर प्रतिक्रिया

अनिल देशमुख यांनी हा हल्ला घडवून आणला असा आरोप भाजपने केला आहे, याकडे सलील देशमुख यांचे लक्ष वेधले असता त्यांनी दीड दमडीच्या आमदाराला मी अधिक महत्व देत नाही, असे सांगून भाष्य करणे टाळले. काटोल मतदारसंघातील भाजप उमेदवार चरणसिंह ठाकूर यांना सत्ताधारी भाजपचा वरदहस्त आहे. अनेक गुन्हेगारांना त्यांनी आश्रय दिला आहे. माजी गृहमंत्र्यांवर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनता व महिला  किती सुरक्षित असतील याचा विचार आता करण्याची वेळ आली आहे, असे सलील देशमुख म्हणाले. यावेळी त्यांनी काटोलमधील अनेक गुन्हेगारी घटनांची माहिती दिली.

हेही वाचा >>>“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…

कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते भाजप नेत्यांच्या घरावर हल्ले करणार , असे काही कार्यकर्ते बोलून गेले. यावर बोलताना सलील म्हणाले, ही नेत्यांवर हल्ला झाल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांची भावना आहे, आम्ही त्यांची समजूत घालू व असे घडू देणार नाही, आम्हीशांततेच्या मार्गाने चालणारे आहोत, हिसा हीभाजपची संस्कृती आहे, असे ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katol assembly constituency salil deshmukh accuses the ruling party in anil deshmukh attack case nagpur news cwb 76 amy