नागपूर: नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघ हा नेहमीच काही ना काही कारणामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत असतोच. त्याचे कारण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख. २०१४ मध्येया मतदारसंघातून देशमुख याचा पराभव देशमुख यांनीच केला होता. ते होते भाजपचे आशीष देशमुख. त्यानंतर २०१९ मध्ये ऐन वेळी अर्ज न भरताच अनिल देशमु परत आले. त्याची चर्चा झाली.नंतर त्यांनी अर्ज भरला व विजयी झाले व गृहमंत्री झाल्याने त्यामुळे पुन्हा काटोल मतदारसंघ चर्चेत आला. आणि आता २०२४ मध्ये अनिल देशमुख याना उमेदवारी जाहीर झाली व त्यांनी ऐनवेळी माघार घेत मुलाला रिंगणात उतरवले. त्यामुळे काटोल चर्चेत आले. आता या मतदारसंघात तुतारी विरुद्ध कमळ अशी थेट लढत होईल, अशी चर्चा सुरू झाल्यावर आता चर्चा आहे ती विरोधी पक्षाच्या नव्या खेळीची.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री झाल्यावर त्यांची कारकीर्द गाजली ती त्यांच्यावर आरोपामुळे आणि त्यांना झालेल्या कारावासामुळे. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी थेट भाजप विरुद्धच एल्गार पुकारला. या पक्षाच्या नेत्यांमुळेच त्यांना कारागृहात जावे लागले, असे आरोप त्यांनी केले. त्यावर त्यांनी अलिकडेच पुस्तकही लिहिले व त्यावर सध्या राजकीय वर्तुळात जोरात चर्चा आहे.
हेही वाचा >>>सावधान! दिवाळीत मिठाई विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
२०२४ मध्ये ते काटोल मतदारसंघातून पुन्हा निडणूक लढणार असेच चित्र होते. पक्षाने त्यांना उमदवारीही दिली. पण त्यांनी स्वत: निवडणूक न लढता पुत्र सलील यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे १९९५ नंतर प्रथमच अनिल देशमुख काटोल मतदारसंघातील लढतीत नाहीत. मात्र विरोधी पक्षाने ही उणीवही दूर केली. त्यांच्याच नावाचा एक उमेदवार शोधला. त्याला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले. आता त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) त्याला पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याला यश आले तर काटोलमध्ये खरे अनिल देशमुख रिंगणात नसले तरी त्यांच्याच नावाचा दुसरा उमेदवार रिंगणात राहणार आहे.
हेही वाचा >>>नागपूर : नरेंद्र जिचकारांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळला
अनिल देशमुख यांच्या जागी विरोधी पक्षाने शोधून काढलेले दुसरे अनिल देशमुख हे मतदारसंघातील नरखेड तालुक्यातील थूगाव निपानी या गावाचे रहिवासी आहे. त्यांच्या पित्याचे नाव शंकरराव आहे. त्यांना राष्ट्रवादीने (अजित पवार) अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना बी फॉर्म दिला आणि तो निवडणूक आयोगाने स्वीकारला तर काटोलमध्ये अनिल देशमुख आणि घड्याळ चिन्ह सुधा मतपत्रिकेवर राहण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला नवीन चिन्ह व त्यासारखेच दिसरणाऱ्या दुसऱ्या चिन्हामुळे फटका बसला होता. त्याची भीती काटोल मतदारसंघातही विरोधीपक्षाच्या खेळी मुळे वर्तवली जात आहे.
अनिल देशमुख काय म्हणाले या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,भाजपने माझ्याच नावाचा व्यक्ती शोधून त्याला निवडणूक रिंगणात भाजपने उतरवले आहे.